दिनेश केळुस्कर, सिंधुदुर्ग 04 ऑक्टोंबर : कोकणातल्या कणकवलीत पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगाणार आहे. अखेरच्या दिवशी भाजपने नितेश राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देत AB फॉर्म दिला. राज्यात युती असली तरी कणकवलीत मात्र ‘युती’ तुटल्यातच जमा आहे. भाजपचे उमेदवार असलेले नितेश राणे यांना कुठल्याही परिस्थितीत शिवसेने पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी राणेंना पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलंय. शिवसेनेने सतीश सावंत यांना पाठिंबा देत AB फॉर्म दिलाय. AB फॉर्म दिल्यामुळे ते सेनेचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत. सतीश सावंत हे काही दिवसांपूर्वीच राणेंच्या स्वाभीमान पक्षातून बाहेर पडले होते. त्यामुळे ही लढत चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. VIDEO: प्रकाश मेहतांच्या समर्थकांकडून पराग शाहांच्या गाडीची तोडफोड शिवसेनेचा प्रखर विरोध असल्यामुळेच नारायण राणे यांचा भाजपमध्ये आत्तापर्यंत प्रवेश होऊ शकला नाही. शेवटी प्रयत्न करून नितेश राणे यांनी भाजपच्या स्थानिक जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. पण शिवसेनेला ती उमेदवारी फारशी आवडलेली नाही. युतीच्या धर्माचं पालन न करता शिवसेना भाजपच्या विरुद्ध लढणार आहे. सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. गेली 24 वर्ष ते नारायण राणेंचे सहकारी होते. मात्र नितेश राणे यांच्या कामाच्या पद्धतीमुळेच आपण पक्ष सोडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. राणेंचा आपल्यावर विश्वास राहिला नाही असंही त्यांनी सांगितलं होतं. मुंबईत भाजप कार्यकर्त्यांचा राडा, आपल्याच उमेदवाराची फोडली गाडी! 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही राणेंनी शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या विरुद्ध निलेश राणेंना उभं केलं होतं. मात्र त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्याचाह राग शिवसेनेला असून राणेंना सहकार्य करण्याची त्यांची भूमिका नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.