मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महाराष्ट्रात पावसाचा कहर! 24 तासांत 9 जणांचा मृत्यू, 838 घरांची पडझड, आता 'या' जिल्ह्याला Red Alert

महाराष्ट्रात पावसाचा कहर! 24 तासांत 9 जणांचा मृत्यू, 838 घरांची पडझड, आता 'या' जिल्ह्याला Red Alert

Heavy Rain in Maharashtra: महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जूनपासून पावसामुळे 76 जणांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय पावसामुळे 838 घरांचे नुकसान झाले आहे. यादरम्यान 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 10 जुलै : राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने (Monsoon rain update) आता आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होतोय, तिथं परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे. यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. पावसामुळे महाराष्ट्रात 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यात 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. याशिवाय 125 जनावरेही पावसामुळे दगावली आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे किमान 130 गावे बाधित झाली असून 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही दिलासादायक बाब आहे की, आतापर्यंत कुठूनही जीवितहानी झालेली नाही.

आषाढी एकादशीदिवशी पुणेकरांसाठी खुशखबर! पाणीकपातीचा निर्णय मागे

मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोलीतील 128 गावांचा संपर्क तुटला आहे. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने शनिवारी जारी केलेल्या बुलेटिननुसार, गडचिरोलीशिवाय मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाऊस झाला. दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात शनिवारी सकाळी 8.30 वाजता बंद झालेल्या पावसाची 24 तासांत 150 मिमी नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील दोन गावे आणि आसना नदीच्या काठावर वसलेल्या शेजारील नांदेड जिल्ह्यातील हदगाव गावांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि मुंबई राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी राज्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. IMD ने मुंबईत पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच महाराष्ट्रात 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
First published:

Tags: Monsoon, Rain fall

पुढील बातम्या