मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Maghi Ganpati 2023 : बाप्पाच्या सजावटीसाठी खरेदी करा जगप्रसिद्ध Eco Friendly मखर, Video

Maghi Ganpati 2023 : बाप्पाच्या सजावटीसाठी खरेदी करा जगप्रसिद्ध Eco Friendly मखर, Video

X
Maghi

Maghi Ganpati 2023 : माघी गणेशोत्सव काही दिवसांवर आलाय. बाप्पाच्या सजावटीसाठी जगप्रसिद्ध Eco Friendly मखर कुठे मिळेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Maghi Ganpati 2023 : माघी गणेशोत्सव काही दिवसांवर आलाय. बाप्पाच्या सजावटीसाठी जगप्रसिद्ध Eco Friendly मखर कुठे मिळेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 जानेवारी : माघी गणेशोत्सवाची लगबग बाजारात सुरू झाली असून सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. यावर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीबरोबर सजावट साहित्यही पर्यावरणपूरक दिसत आहे. थर्माकॉल वापरावर बंदी असल्याने मुंबईतील लालबागच्या बाजारात पुठ्ठ्यापासून बनवलेले पर्यावरणपूरक मखर गणेश भक्तांसाठी मखर विक्रते नाना शेंडकर यांनी उपलब्ध करून दिले आहेत.

कशी झाली सुरुवात?

नाना शेंडकर यांना थर्माकॉल मखरचे दुष्परिणाम दिसत होते. निर्माण होणाऱ्या ट्रकच्या ट्रक कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागायची. त्याचबरोबर थर्माकॉलच्या कामातून संपूर्ण परिसरात थर्माकॉलचे बारीक बारीक कण हवेत भरून राहायचे. म्हणून 2000 साली थर्माकॉलचा दोन एकरमधला 50 ते 75 कारागीरांचा कारखाना बंद केल्यानंतर नाना शेंडकर यांनी पर्यावरणपूरक मखर तयार करण्यासाठी कागदी पुठ्ठ्यांचा वापर केला. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर लो बजेट, वापरायला, बाळगायला, हाताळायला सोप्या असलेल्या पुठ्ठ्याचा पर्याय त्यांनी निवडला. त्यातूनच जन्माला आले कागदी पुठ्ठ्यांचे पर्यावरणस्नेही इकोफ्रेंडली मखर.

अल्पावधीत आम्ही तयार केलेल्या मखरांची कीर्ती चहूकडे पसरली. अमेरिका, जर्मनी, दुबई, अबुधाबी, श्रीलंका या देशांमध्ये उत्सवाच्या काळात  मखरांना मोठी मागणी असते. घरगुती तीन फुटांपासून ते अगदी सार्वजनिक 30 फुटांपर्यंतचे मखर आमच्याकडे उपलब्ध आहेत, असं नाना शेंडकर सांगतात.

Maghi Ganpati 2023: तुमच्या नावाचा बाप्पा साकारणारा अक्षरांचा जादूगार, Video

सुवर्ण मखर, कोकण मखर, मीनाक्षी मखर, वनराई मखर, गडकिल्ला मखर सध्या आमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या मखरची किंमत  900  रुपये आहे. थर्माकॉल बंदी असल्यामुळे माघी गणेशोत्सवानिमित्त पुठ्ठ्याचा पर्यावरणपूरक मखर भाविक खरेदी करत आहेत, असंही नाना शेंडकर यांनी सांगितले.

कुठे कराल मखर खरेदी? 

प्रभा कुटीर, गणेश गल्ली, लालबाग, मुंबई, महाराष्ट्र

First published:

Tags: Local18, Mumbai