Home /News /mumbai /

'अफजल खान, औरंगजेब, भोंगा यापेक्षा पेट्रोल-डिझेल अन् बेरोजगार तरुणांबद्दल बोलूया'; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

'अफजल खान, औरंगजेब, भोंगा यापेक्षा पेट्रोल-डिझेल अन् बेरोजगार तरुणांबद्दल बोलूया'; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टोला लगावला.

    नवी मुंबई, 22 मे : अफजल खान, औरंगजेब, भोंगा यापेक्षा पेट्रोल-डिझेल, गॅसच्या वाढलेली किमंत, बेरोजगार झालेले तरुण यावर बोलण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. 300-350 वर्षे जुना इतिहास पोखरून निष्कारण आगी लावण्याचा काम करू नये. तुमच्या भोंग्यांचा राजकारण झालं, मला अभिमान आहे महाराष्ट्र धर्म जागा झाला आणि त्यांनी ओळखले की हे फक्त दंगली घडविण्यासाठी करत आहेत, त्यामुळे 3 तारखेला काहीही झालं नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला. पण तुमच्या त्या एका कृत्यामुळे महाराष्ट्रातील हिंदू धर्माच्या तमाम काकड आरत्या बंद झाल्या. रात्रीची कीर्तन-प्रवचन बंद झाली. तुम्ही कोणाला मारायला गेलात आणि कोण मेलं, याचा जरा विचार करा.  मात्र  मला अभिमान वाटतो या महाराष्ट्राच्या मातीचा.. कारण या  मातीमध्ये जो धर्म आहे तो जागा झाला आणि तो यांच्या जाळ्यात फसला नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवरील संताप व्यक्त केला. राज ठाकरेंची पुण्यातील सभा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राणा दाम्पत्य, संजय राऊत, ओवैसींवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमणा मारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फक्त सांगावं त्यांच्यावर एक तरी केस आंदोलनाची आहे का, असा सवाल करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला धारेवर धरले. मुंबईच्या सभेत तर ते औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय, असेही बोलले. पण उद्धव ठाकरे आहेत तरी कोण? तुम्ही महात्मा गांधी किंवा वल्लभभाई पटेल आहात का?, असा शब्दांत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Jitendra awhad, Raj Thackary

    पुढील बातम्या