मुंबई, 19 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी (maharashtra Legislative Council Elections) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली. भाजपनेही (bjp) या निवडणुकीसाठी उमेदवारांची नाव जाहीर केली आहे. कोल्हापूरमधून (kolhapur) अमल महाडीक (amal mahadik) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर धुळे नंदुरबारमधून अमरिश पटेल (amrish patel) यांना संधी देण्यात आली आहे. एकूण पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. आज भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. कोल्हापूरमधून अमन महाडिक, धुळ्यातून अमरिश पटेल, नागपूर मधून चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्यातून वसंत खंडेलवाल आणि मुंबईतून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार आहे. भाजपचे विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार १ कोल्हापूर- अमल महाडीक २ धुळे नंदुरबार- अमरिष पटेल ३ नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे ४ अकोला-वाशीम वसंत खंडेलवाल ५ मुंबई- राजहंस धनंजय सिंह असा आहे कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्य सर्वश्री कदम रामदास गंगाराम (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), पाटील सतेज उर्फ बंटी (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि व्यास गिरीषचंद्र बच्छराज (नागपूर मतदारसंघ) यांची दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021 मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतमोजणीचा दिनांक - 14 डिसेंबर 2021 आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - 16 डिसेंबर 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.