Home /News /maharashtra /

कर्नाळा बँकेत 1 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, ठेवीदारांचा ठिय्या!

कर्नाळा बँकेत 1 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, ठेवीदारांचा ठिय्या!

रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत 1 हजार कोटी रूपयांचा घोटाळा माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी केला, असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमयांनी केला होता

    विनय म्हात्रे, प्रतिनिधी नवी मुंबई, 29 जानेवारी :आपल्या आयुष्यभराची पुंजी मिळावी यासाठी ठेवीदारांनी खारघर मधील कर्नाळा बँकेच्या शाखेत आज ठाण मांडलंय. या बँकेत 1 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'एकतर आमचे पैसे द्या अन्यथा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांना बोलवा अन्यथा आम्ही बँक बंद होऊ देणार नाही', असा पवित्रा ठेवीदारांनी घेतला होता. रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत 1 हजार कोटी रूपयांचा घोटाळा माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी केला, असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमयांनी केला होता. या बॅंकेचे सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बॅंकेने ऑडिट केले असता करोडो रूपयांची बेनामी खाती असल्याचं समोर आलं आहे. कर्नाळा बॅंकेत गेल्या 8 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेनामी खातदारकांच्या नावाने खाते उघडून यात करोडो रूपयांची कर्जरूपी रक्कम देवून ती आपल्या मालकीच्या ट्रस्टमध्ये विवेक पाटील यांनी वळती केली असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. किरीट सोमय्या, भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण आमदार महेश बालदी यांनी पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या स्पेशल ऑडिटमध्ये विवेक पाटील हे दोषी असल्याचा दावा केला होता. विवेक पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बेनामी खाती उघडली. या खात्यात 700 करोड रूपयांच्या वर रक्कम कर्जरूपी टाकण्यात आली. तिथून ती विवेक पाटलांच्या मालकीचे असलेले कर्नाळा स्पोर्टस क्लब आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये या रक्कमा वळत्या करीत त्या हडप करण्यात आल्या आरोप करण्यात आला. तसंच याबाबत त्वरीत ईडीमार्फत विवेक पाटील आणि कर्नाळा बँकेचे अधिकारी, संचालकांच्या चौकशी करून त्यांना अटक करण्याची मागणी किरीट सोमयांनी केली होती. कर्नाळा नागरी सहकारी बॅंक बुडीत निघाली असून यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या करोडो रूपयांच्या ठेवी पणाला लागल्या आहेत. ईडीनी त्वरीत विवेक पाटील यांची संपत्ती जप्त करून खातेदारकांना पैसे परत द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाळा बॅंकेत कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसून अनियमितता झाली असल्याचं विवेक पाटील यांनी सांगितलं. राजकीय विरोधापोटी आपल्यावर आरोप होत असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या