मुंबई, 26 ऑक्टोबर : शिवसेना (Shivsena) विरुद्ध कंगना रणौत (Kangana Ranaut) सामना पुन्हा एकदा रंगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (CM uddhav thackeray dasara melava speech) दसरा मेळाव्यातून टीका केल्यानंतर कंगनाने जोरदार पलटवार केला आहे. ‘तुम्ही जनतेचे सेवक आहात, सत्ता येत असते आणि जात असते, पण सन्मान एकदा गेल्यावर तो परत मिळत नाही, असं म्हणत कंगनाने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. कंगना रणौतने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर (kangana ranaut twitter) एक व्हिडीओ प्रसिद्ध करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मला शिवी दिली. मला नमकहराम म्हटले आहे. याआधीही शिवसेनेच्या नेत्यांनी तोंड फोडणे आणि मारहाण करणार, अशी भाषा वापरली आहे. पण तुम्ही आपल्या भाषणामध्ये हिमाचलबद्दल ज्याला देवभूमी म्हटले जाते, त्याबद्दल अत्यंत वाईट भाषा वापरून महाराष्ट्राच्या मान शरमेनं झुकवली आहे. आपण मुख्यमंत्री असून असे वक्तव्य केले आहे’, अशी टीका कंगनाने केली.
Message for Maharashtra government... pic.twitter.com/WfxI9EII38
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 26, 2020
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपण माझ्यावर नाराज झाला होता. जेव्हा मी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यावेळी मुंबईत स्वतंत्र्य काश्मीरबद्दल घोषणाबाजी झाली होती. त्यामुळे मी ते वक्तव्य केले होते. पण, त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांनी माझा विरोध केला. तुम्ही तुमच्या भाषणात भारताची तुलना पाकशी केली तेव्हा संविधान वाचवणारे कुणीही पुढे येणार नाही. कारण त्यांना कुणीही पैसे देत नाही, असा आरोपही कंगनाने केला. ‘तुम्ही तुमच्या भाषणात सर्वांसमोर माझ्यावर टीका केली. पण, सत्ता ही येत असते आणि जात असते. महाराष्ट्राची जनता तुमच्यावर नाराज आहे. पण तुम्ही एकदा सन्मान गमवाला तर तो परत मिळत नाही, असा सल्लावजा टोलाही कंगानने लगावला. याआधीही कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. ‘मुख्यमंत्री, स्वत: ला लाज वाटली पाहिजे. तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि तुम्ही या क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालत आहात. तुमच्याकडे असलेल्या सत्तेचा वापर हा इतरांना अपमानीत करण्यासाठी आणि हानी पोहोचवण्यासाठी करत आहात. घाणरेडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी’, अशी विखारी टीका कंगनाने केली होती.
You being a leader having such a vengeful, myopic and ill informed views about a state which has has been the abode of Lord Shiva and Maa Parvati along with many great saints like Markandya and Manu Rishi, Pandavas spent large part of their exile in Himachal Pardesh.. cont
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 26, 2020
तसंच, ‘मुख्यमंत्री ठाकरे हे देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना महाराष्ट्राचे ठेकेदार कुणी बनवले? तुम्ही आज जनतेचे सेवक आहात, याच्या आधी या खुर्चीवर कुणी तरी होतं. तुमच्यानंतरही या खुर्चीवर कुणी तरी बसेल. पण तुम्ही महाराष्ट्र स्वत: च्या मालकीचा असल्यासारखं का वागताय? असा सवालही कंगनाने केला होता.