Home /News /mumbai /

..अन् पक्षाच्या मफलरीचा मास्क होतो तेव्हा; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा 'तो' VIDEO आला समोर

..अन् पक्षाच्या मफलरीचा मास्क होतो तेव्हा; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा 'तो' VIDEO आला समोर

Jan Ashirwad Yatra : हा VIDEO सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंबरनाथ, 18 ऑगस्ट : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या राज्यातील चार नेत्यांनी मंत्रिमंडळाचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर हे मंत्री आता महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) करत आहेत. चारपैकी खासदार कपिल पाटील, डॅाक्टर भारती पवार, डॅाक्टर भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. या जन आशीर्वाद यात्रेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खासदार कपिल पाटील यांनी कोरोनाच्या सर्व नियमावलीचं पालन केल्याचं दिसत आहे. त्यांनी मास्कपासून फेस शिल्डदेखील लावल्याचं दिसत आहे. (Jan Ashirwad Yatra Union Minister Kapil Patil himself tied the party muffler around the ambernath city presidents mouth) आज ते अंबरनाथ पश्चिमेला भेटीसाठी आले होते. अंबरनाथ पश्चिमेला भाजप शहराध्यक्ष मास्क न लावताच कपिल पाटील यांच्या शेजारी उभे राहिले होते. कपिल पाटील (Union Minister Kapil Patil) यांना हे लक्षात येताच त्यांनी त्यांना मास्क लावण्यास सांगितलं. हे ही वाचा-Jan Ashirwad: बाळासाहेबांच्या आशीर्वादाने नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा मात्र तरीही त्यांनी ऐकलं नाही. शेवटी कपिल पाटील यांनी शहराध्यक्षाच्या गळ्यात घातलेले पक्षाचे मफलर त्याच्या तोंडाजवळ नेले आणि बांधण्यास सांगितलं. त्यानंतर मात्र शहराध्यक्षांना मुकाट्याने मास्क काढून तोंडावर लावला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग खात्याच्या मंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा करत आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Ambernath, BJP, Mask, Viral video.

पुढील बातम्या