मुंबई, 17 ऑगस्ट : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या राज्यातील चार नेत्यांनी मंत्रिमंडळाचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर हे मंत्री आता महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) करत आहेत. चारपैकी खासदार कपील पाटील, डॅाक्टर भारती पवार, डॅाक्टर भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. तर केंद्रीय सुक्ष्म आणि लघू उद्योग मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) हे 19 ऑगस्ट पासून आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आशीर्वाद घेत नारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करत आहेत.
जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर जाऊन त्यांना अभिवादन करणार आहेत. नारायण राणे पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाणार आहेत त्यामुळे या जन आशीर्वाद यात्रेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्री नारायण राणे मात्र 19 ॲागस्टपासून मुंबईतून या यात्रेची सुरूवात करणार आहेत. 560 किमीचा प्रवास हे मंत्री या यात्रेतून करणार असून राज्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेवून ही यात्रा केली जात आहे. त्यात मराठवाडा, कोकण प्रांत पूर्णपणे पिंजून काढला जाणार आहे.
"शरद पवारांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी करावी असं नाही" राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग खात्याच्या मंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा करत आहेत. 19 आणि 26 ऑगस्ट राणेंचे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत तसेच या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
अशी असेल नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा
19 ऑगस्ट - मुंबई शहर
20 ऑगस्ट - मुंबई उपनगर
21 ऑगस्ट - वसई विरार
23 ऑगस्ट - महाड
24 ऑगस्ट - चिपळूण
25 ऑगस्ट - रत्नागिरी
26 ऑगस्ट - सिंधुदुर्ग
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.