मुंबई : IRS अधिकारी सचिन सावंत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सचिन सावतं यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम एवढी मोठी आहे की अधिकाऱ्यांचंही डोक चक्रवून जाईल. सचिन सावंत यांची 2011 ला मालमत्ता होती 1 कोटी 4 लाख होती. तीच रक्कम आता वाढून 2022 ला 2 कोटी 1 लाख झाल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार CBI नं यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यात सावंत यांचे आईवडील आणि पत्नीही आरोपी होते. नवी मुंबईच्या सानपाडा परिसरातील सी क्वीन हेरिटेज बिल्डिंगमध्ये सावंत यांनी सेव्हन हिल कन्स्ट्रोवल या कंपनीच्या नावे फ्लॅट खरेदी केला ज्या कंपनीत सावंत यांचे वडील डायरेक्टर होते. सावंत यांचे वडील बाळासाहेब सावंत हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.
प्रदीप कुरूलकर प्रकरणात ट्विस्ट; DRDO कडून घडली मोठी चूक!1 कोटी 3 लाखांच्या फ्लॅट खरेदीसाठी 1 कोटी 2 लाख रोख रक्कम दिल्याची माहिती मिळाली आहे. ही रोख रक्कम बेकायदेशील असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं. सावंत यांचे वडील डायरेक्टर असलेल्या सेव्हन हिल कन्ट्रोवेल कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय दादरच्या एका चाळीत आहे. या कंपनीने एकदाच आयकर भरला असून उर्वरित आयकर थकवल्याचाही आरोप आहे. 2018-19 या वर्षासाठी भरलाय आयकर दरम्यान कंपनीने आयकर नियमाप्रमाणे भरला होता. या कंपनीच्या आयकर रेकॉर्डवर, खातेधारक म्हणून सचिन सावंत यांचा मोबाईल नंबर आहे. सावंत वापरत असलेली 44 लाखांची BMW ही सुद्धा बेनामी संपत्ती असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. ही BMW कार मनोज लुंकड या नावानं रजिस्टर्ड आहे.
पवारांनी डबल गेम केला, पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांचा गौप्यस्फोटएवढी सगळी संपत्ती आली कुठून आणि ही बेनामी संपत्ती जमवण्यासाठी सचिन सावंत यांना कोणी मदत केली याबाबत सध्या चौकशी सुरू आहे. या सगळ्या प्रकरणानंतर सचिन सावंत यांच्या अडचणी वाढल्या असून आता चौकशीच्या आणि अधिक संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत.