BREAKING: महाराष्ट्राची मागणी मान्य; राज्याला रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी सुरू

BREAKING: महाराष्ट्राची मागणी मान्य; राज्याला रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी सुरू

रेल्वेने आता राज्याला ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा लवकरच दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल: महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) जाणवत असल्याने इतर राज्यांतून होणारा वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेमार्फत (Oxygen supply via railway) करण्यात यावा अशी मागणी आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली होती. आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या या मागणीला आता रेल्वेकडून (Indian Railway) परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात रेल्वेच्या सर्व विभागांना पत्र पाठवण्यात आले आहे.

महाराष्ट्राला रेल्वेच्या माध्यमातून वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा यासाठी रेल्वेने परवानगी दिली आहे. रेल्वेने ट्रक उतरवण्यासाठी रॅम्पची माहिती मागवली असून रो-रो सर्व्हिसच्या माध्यमातून वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. यानुसार आता मालगाडीत थेट ट्रक, टँकर ठेवले जातील आणि महाराष्ट्रातील रॅम्प असलेल्या ठिकाणी हे ट्रक, टँकर उतरवले जातील. यामध्ये मुलुंड, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कळंबोली या ठिकाणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा: Maharashtra corona case : राज्याला कोरोनाचा विळखा आणखी घट, चिंताजनक आकडेवारी समोर

राजेश टोपेंनी केली होती मागणी

महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माद्यमातून संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातील परिस्थिती विषयी माहिती देतांना आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली.

महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता अन्य राज्यांतून महाराष्ट्राकडे ऑक्सिजन घेऊन जाणारी वाहने अडविली जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याविषयी केंद्रीय गृहसचिवांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. रस्तेमार्गे ऑक्सिजन वाहतुकीचा कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून त्याची वाहतुक करण्यात यावी यासाठी केंद्र शासनाने रेल्वे विभागाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती.

Published by: Sunil Desale
First published: April 17, 2021, 10:08 PM IST

ताज्या बातम्या