अपक्ष आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत प्रवेश; राज्यात भाजपला आणखी एक झटका

अपक्ष आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत प्रवेश; राज्यात भाजपला आणखी एक झटका

काल एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला होता.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा आज अखेर शिवसेनेत प्रवेश झाला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गीता जैन यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याचे समोर आले आहे.

काल (23 ऑक्टोबर) भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आज मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जैन या मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार आहेत. गीता जैन यांच्यासोबत मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही नगरसेवकही प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीत गीता जैन यांनी भाजपमधून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. मीरा-भाईंदरसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने शेवटी त्यांनी बंडखोर म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्या विजयी झाल्या.

हे ही वाचा-मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

आता बदलती समिकरण लक्षात घेऊन त्यांनी थेट शिवसेनेतच प्रवेश केला आहे. याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. माजी महापौर असलेल्या जैन यांचं मीरा भाईंदर मध्ये कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे. विधानसभा निवडणुकीत जैन यांना शिवसेनेने मदतही केली होती.

Published by: Meenal Gangurde
First published: October 24, 2020, 3:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading