ठाणे, 16 जानेवारी : ठाण्यातील आंबिवली येथे झोपडीत राहणारे बाबूसाहेब अहिर मजुरी करुन दिवसाचे 300 रुपये कमवतात. आयकर विभागाने (Income Tax Department) त्यांना जी नोटीस पाठवली आहे ते पाहून अहिरच काय पण कोणीही गोंधळात पडेल. आयकर विभागाने दिवसाला 300 रुपये कमावणाऱ्या मजुराला 1.05 कोटी रुपयांची आयकर नोटीस पाठवली आहे. याबाबत अशी माहिती समोर येत आहे, की नोटाबंदीच्या काळात अहिर यांच्या बॅंक खात्यात 58 लाख रुपये जमा करण्यात आले होते.
बाबूसाहेब अहिर यांना बॅंक खात्याची माहितीच नव्हती
आयकर नोटीस मिळाल्यानंतर बाबूसाहेब अहिर यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. अहिर यांचे म्हणणे आहे, 58 लाख रुपय़े असलेल्या या बॅंक खात्याविषयी माहिती नसल्याचे अहिरांचे म्हणणं आहे. बनावटी कागदपत्रांचा वापर करुन बॅक खाते सुरू केल्याची शक्यता अहिरांनी व्यक्त केली आहे. अहिर आपल्या सासऱ्यांसोबत त्यांच्या झोपडीतच राहतो. 2016 मध्ये त्याला बॅंक खात उघडल्याची नोटीस आली तेव्हा त्याला आपल्या नावाचे बॅंक खाते उघडल्याचं कळलं. तेव्हाच त्यांनी आयकर विभाग व बॅंकेशी संपर्क केला. तेव्हा त्याचा पॅन कार्डचा उपयोग करून बॅक खाते उघडल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर 7 जानेवारी रोजी आयकर विभागाकडून अहिरांना 1.05 कोटी रुपयांची नोटीस पाठविण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank account, Demonetisation, Income tax, Pan card