जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / पनवेलमध्ये भाजप नगरसेवकाने केलं जंगी बर्थडे सेलिब्रेशन, पोलिसांनी 11 जणांना केली अटक

पनवेलमध्ये भाजप नगरसेवकाने केलं जंगी बर्थडे सेलिब्रेशन, पोलिसांनी 11 जणांना केली अटक

पनवेलमध्ये भाजप नगरसेवकाने केलं जंगी बर्थडे सेलिब्रेशन, पोलिसांनी 11 जणांना केली अटक

लोक सोशल डिस्टिंसिंग पाळत आहेत आणि इकडे नगरसेवकाने नियम धाब्यावर बसवल्याने आदर्श नागरिक कोण असा प्रश्न उपस्थित राहतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

पनवेल, 11 एप्रिल : संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला असतानाही पनवेलमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका भाजप नगरसेवकाने लॉकडाऊन असतानाही मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू आहे. लोक सोशल डिस्टिंसिंग पाळत आहेत आणि इकडे नगरसेवकाने नियम धाब्यावर बसवल्याने आदर्श नागरिक कोण असा प्रश्न उपस्थित राहतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नगरसेवक अजय बेहरा यांनी त्यांच्या 10 मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. 10 मित्रांसोबत बर्थडे पार्टी करताना त्यांनी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आहे. पनवेल पोलिसांनी केली 11 जणांवर कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात पार्टी करताना अटक करणारी राज्यातील पहिलीच घटना आहे. नाशिक SP आरती सिंहचा डबल रोल, 15 तासांच्या ड्यूटीमध्ये डॉक्टर बनूनही घेतात काळजी दरम्यान, घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टिंसिंगचा वापर करा अशा अनेक सूचना माध्यमांमधून, प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून देण्यात येत आहेत. पण त्याच नियमांचं उल्लंघन करत जर नगरसेवकानेच असं कृत्य केलं तर नागरिक कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार असा प्रश्नच आहे. त्यामुळे नगरसेवक अजय बेहराचा नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सावधान! निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा होतोय कोरोना, डॉक्टरही झाले हैराण यावर आता कठोर कारवाई कर महापालिका आयुक्त नगरसेवकपद रद्द करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, घराच्या बाहेर पडू नका, घरात असतानाही अंतर ठेवून बसा अशा सूचना देऊनही शहराचे अधिकारीच असे नियम मोडतात त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. देशात सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसून येत आहे. कोरोनाचे एक हजार रुग्ण आढळलेले मुंबई हे देशातील पहिले शहर बनले आहे. शुक्रवारी मुंबईत 132 नवीन रुग्ण आढळले. शुक्रवारी मुंबईत कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 1364 रुग्ण आढळले आहेत तर 97 लोकांचा बळी गेला आहे. कोरोनाने घेतला 200 हून अधिक लोकांचा बळी, वाचा काय आहे तुमच्या राज्यातली स्थिती संकलन, संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP , corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात