नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : शिंका (sneeze) येणं हा शरीराच्या प्रक्रियेचा एक सामान्य भाग आहे, परंतु जर शिंका वारंवार (sneeze frequently ) आणि सतत येत असतील तर ती एक समस्या असू शकते. साधारणपणे, वारंवार शिंका येण्याचे कारण कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती मानली जाते. वास्तविक, नाकात एक श्लेष्मल त्वचा असते ज्याच्या ऊती आणि पेशी अतिशय संवेदनशील असतात, जेव्हा हे ऊतक आणि पेशी बाहेरील कोणत्याही उत्तेजक गंध किंवा वस्तूच्या संपर्कात येतात तेव्हा शिंका येणं सुरू होतं. याशिवाय, कधीकधी शिंकण्याचे कारण धूळ, बुरशी, तीव्र प्रकाश, तीव्र वास, मसालेदार अन्न, सामान्य सर्दी इत्यादीसारख्या विशिष्ट गोष्टींची ऍलर्जी देखील असू शकते. शिंकणे थांबवण्यास फायदेशीर असणाऱ्या काही उपायांची आज आपण माहिती घेऊयात. मध घ्या मध हे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए, बी, सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस असलेले एक उत्तम औषध आहे. त्यामुळे शिंकण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. वाफ घेणे वाफ घेतल्यानेही ही समस्या आटोक्यात ठेवता येते. यामुळे थंडीचा प्रभाव कमी होतो, तसेच नाकातून श्वास घेण्याचा मार्ग मोकळा होतो. तुम्हाला फक्त एका भांड्यात पाणी गरम करायचे आहे आणि तुमचे डोके टॉवेलने झाकायचे आहे आणि येणारी वाफ इनहेल करायची आहे. व्हिटॅमिन सीने समृद्ध अन्न रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, शिंका येण्याची समस्या टाळण्यासाठी देखील ते प्रभावी आहे. व्हिटॅमिन सीसाठी संत्री, मोसमी, लिंबू, आवळा इत्यादी आंबट पदार्थांचे सेवन करावे. हे वाचा - दिराच्या लग्नात वहिनीचा भन्नाट डान्स, पाहा जबरदस्त VIDEO, अल्पावधीत लाखो लोकांच्या पसंतीत हळदीचे दूध हळद ही अँटी-एलर्जिक मानली जाते. गरम दुधात हळद टाकून रोज प्या. यामुळे वारंवार शिंकण्याच्या समस्येवर मात करता येते. हिवाळ्यात कच्ची हळद वापरता येते. काळी वेलची दिवसातून दोन-तीन वेळा काळी वेलची चघळल्यानेही शिंका येणे आणि अॅलर्जीमध्ये खूप आराम मिळतो. याशिवाय आले आणि तुळस दोन्ही थंडीशी लढण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. चहामध्ये आले आणि तुळस घालून सेवन केल्याने खूप आराम मिळतो. निलगिरी तेल जर तुम्हाला धूळ आणि ऍलर्जीमुळे शिंक येत असेल तर निलगिरीचे तेल खूप उपयुक्त ठरू शकते. त्याचे काही थेंब पाण्यात टाकून तुम्ही वाफ घेऊ शकता किंवा स्वच्छ रुमाल ठेऊन त्याचा वास घेऊ शकता. हे वाचा - Black Rice: हृदयविकारांसह अनेक आजारांवर काळा तांदूळ आहे गुणकारी; वाचा सर्व फायदे संरक्षण कसे करावे 1. भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात कोमट पाणी प्या. 2. एका वेळी भरपूर अन्न खाऊ नका, थोडे-थोडे अन्न घ्या. 3. मसालेदार अन्न टाळा. 4. दारूचे सेवन करू नका. 5. वेळोवेळी नेजल स्प्रे वापरा. 6. तुमच्या घरात ह्युमिडिफायर वापरा. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.