• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ठाण्यात दहिहंडी उत्सवावरुन मनसे- पोलीस आमने सामने, पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

ठाण्यात दहिहंडी उत्सवावरुन मनसे- पोलीस आमने सामने, पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

Dahihandi Celebration mns: : ठाण्यात दहिहंडी (Thane Dahihandi) उत्सवावरुन (MNS) मनसे - पोलीस (Thane Police) आमने सामने आली आहे.

  • Share this:
ठाणे, 30 ऑगस्ट: ठाण्यात दहिहंडी (Thane Dahihandi) उत्सवावरुन (MNS) मनसे - पोलीस (Thane Police) आमने सामने आली आहे. कोरोनामुळे (Corona Virus) गेल्या वर्षी दहीहंडी उत्सव (Dahihandi Celebration) रद्द करण्यात आला. यंदाही कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) येण्याची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाच्या आयोजनास परवानगी नाकारली आहे. मात्र मनसेनं हा उत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भगवती मैदानावर मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव ( MNS Avinash Jadhav) आंदोलनाला बसले आहेत. मात्र त्यानंतर काही वेळात मनसे पदाधिका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मनसैनिक पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ठाण्यात भगवती मैदानावर मनसैनिक पुन्हा आले आणि ते दहिहंडी साजरी करणारच असं म्हणत पुन्हा उपोषणाला बसले. मात्र काही वेळातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. शिवसेनेला राजकारण करताना कोरोना आडवा येत नाही. मात्र हिंदूंचे सण साजरे करताना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो का असा सवाल अविनाश जाधव यांनी यावेळी उपस्थित केला आहे. जुहूमधील नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालतं. मुख्यमंत्र्यांचा भाचा शेकडो लोकांना घेऊन आंदोलन करतो ते चालतं, असंही जाधव म्हणालेत. तसंच काल नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रा कुडाळमध्ये होते. त्यावेळी शिवसेनेच्या शाखेसमोर शे-दीडशे लोकं जमली होती. ते चालतं का?. मात्र हिंदूंचे सण म्हटल्यावर कोरोनाचं कारण पुढे केलं जातं, असं म्हणत अविनाश जाधव यांनी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान दहीहंडी साजरी करण्यासंदर्भात ठाम असल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं. मनसेकडून ठाण्यातील भगवती शाळेजवळच्या मैदानामध्ये दरवर्षी दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी घातली आहे. राज्य सरकारच्या निर्णयावर मनसेने नाराजी व्यक्त करत दहीहंडी होणारच असा पवित्रा घेतलाय.
Published by:Pooja Vichare
First published: