मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'तुझ्या बायकोचे...' जेलमध्ये कैद्यांनी चिडवलं, जामीन घेऊन पत्नीचा जीव जाईपर्यंत डोकं फोडलं!

'तुझ्या बायकोचे...' जेलमध्ये कैद्यांनी चिडवलं, जामीन घेऊन पत्नीचा जीव जाईपर्यंत डोकं फोडलं!

संशयाचं भूत डोक्यात शिरलं की, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. मुंबईत एका कैद्याने आणि एका तरुणाने पत्नीची हत्या केल्याची घटना उघड झाली.

संशयाचं भूत डोक्यात शिरलं की, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. मुंबईत एका कैद्याने आणि एका तरुणाने पत्नीची हत्या केल्याची घटना उघड झाली.

संशयाचं भूत डोक्यात शिरलं की, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. मुंबईत एका कैद्याने आणि एका तरुणाने पत्नीची हत्या केल्याची घटना उघड झाली.

मुंबई, 11 मार्च :  संशयाचं भूत डोक्यात शिरलं की, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. मुंबईत एका कैद्याने  कोर्टातून जामीन घेऊन पत्नीची चारित्र्याच्या संशयातून हत्या केल्याची घटना वडाळा इथं घडली. तर आणखी एका घटनेत एका तरुणाने  पत्नी ब्लॅकमेल करते म्हणून तिची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं आहे.

वडाळा इथं घडलेल्या घटनेत नसीम अंसारी असं आरोपी पतीचं नाव आहे.  मित्रांच्या सांगण्यावरून नसीमने आपली पत्नी यास्मिन बानोच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि त्यातूनच त्याने पत्नीची हत्या केली. धक्कादायक म्हणजे, चोरीच्या एका गुन्ह्यांत नसीम जेलमध्ये होता. त्यावेळेस त्याला त्याची पत्नी यास्मिन बानो भेटायला येत नव्हती. त्यामुळे जेलमधील इतर कैदी हे नसीमला तुझ्या पत्नीचे कुणाशी तरी संबंध आहे, असं म्हणून टोमणे मारत होते.

इथूनच त्याच्या मनात पत्नी विषयी राग तयार झाला आणि त्याने याबाबत पत्नीला जाब विचारण्याकरता कोर्टातून जामीन घेतला. जामीन घेतल्यानंतर थेट आपल्या घरी जाऊन त्याने मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. नसीमवर संशयाचे भूत इतके चढले होते की, त्याने पत्नीचे डोके बाथरूममधील भींतीवर जोरात आदळले. भीतींवर डोकं आपटल्यामुळे पत्नीने जीव सोडला.

पत्नीची हत्या केल्यानंतर नसीम घरातून पळून गेला होता. शेजाऱ्यांनी पोलिसांनी या घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नसीम हा अजमेरला पळून जाईल, अशी शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी 4 टीम तयार केल्या. त्यानंतर शहरातील मुख्य रेल्वे स्थानकांवर तपास सुरू केला. त्यावेळी भायखळा रेल्वे स्थानकावर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नसीमच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी नसीमविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रेम, ब्रेकअप आणि हत्या

तर दुसऱ्या एका घटनेत पवईमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्याचं 8 महिन्यानंतर उघड झालं. मालवणी इथं राहणारी दिपाली यादव नावाच्या या तरुणीने त्याचा मित्र नासीरशी लग्न केलं होतं.  काही दिवस ते एकत्र राहिले होते. मात्र, लगेच त्यांचं ब्रेकअप झालं. त्यामुळे दिपाली पुन्हा आपल्या आई वडीलांसोबत राहू लागली. त्यानंतर काही महिन्यानंतर अचानक 27 जुलै 2019 रोजी दिपाली बेपत्ता झाली. तिचा खूप शोध घेतला गेला. मात्र, तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. नासीरशी दिपालीचं ब्रेक अप झाल्यानं त्याबाबत घरच्यांनी पोलिसांना नासिरची माहिती दिली नव्हती.

शेवटी एका खबऱ्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी नासिरचे फोन रेकॉर्ड तपासले असता दिपाली यादव बेपत्ता होण्याच्या काही तास आधी नासीर आणि दिपालीशी फोनवर बोलणं झालं होतं. ही माहिती मिळताच पोलिसांनी नासिरला ताब्यात घेऊन चौकशी केली. पण, सुरुवातील त्याने उडावउडवीची उत्तर दिली. पोलिसांनी नासीरला खाक्या दाखवताच त्याने दिपालीची हत्या केल्याचं कबूल केलं.

नासीरने आठ महिन्यापूर्वी आपला ड्रायव्हर मित्र ललनला हाताशी घेऊन दिपालीची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर दिपालीची मृतदेह हा खाडीत फेकून दिला होता. नासीर हा विवाहित होता. एकत्र राहत असताना दिपाली नासीरला ब्लॅकमेल करत होती. ब्लॅकमेलला कंटाळून नासीरने तिची हत्या केल्याचं, पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी सांगितलं.

पोलिसांनी दोन्ही घटनांमधील पती आरोपींना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. मात्र, मुंबईत या पत्नी हत्या कांडामुळे एकच खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Mumbai, News, Wife