मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर केवळ 26 जण पॉझिटिव्ह, पालिकेचं सर्वेक्षण

मुंबईत कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर केवळ 26 जण पॉझिटिव्ह, पालिकेचं सर्वेक्षण

Mumbai Vaccination: मुंबईतील (Mumbai) 2.9  लाख कोरोना रूग्णांच्या सर्वेक्षणात हे स्पष्ट देखील झालं आहे.

Mumbai Vaccination: मुंबईतील (Mumbai) 2.9 लाख कोरोना रूग्णांच्या सर्वेक्षणात हे स्पष्ट देखील झालं आहे.

Mumbai Vaccination: मुंबईतील (Mumbai) 2.9 लाख कोरोना रूग्णांच्या सर्वेक्षणात हे स्पष्ट देखील झालं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 28 जून: कोरोनाचा (Corona Virus) प्रसार रोखण्यासाठी राज्यात विविध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. मुंबईतही कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत चालला आहे. मुंबईत कोरोना रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग झपाट्यानं वाढवला. कोरोनाविरुद्ध लस (Corona vaccine) हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. मुंबईतील (Mumbai) 2.9 लाख कोरोना रूग्णांच्या सर्वेक्षणात हे स्पष्ट देखील झालं आहे. मुंबई पालिकेनं (BMC) 1 जानेवारी ते 17 जून या कालावधीत 2 लाख 90 हजार कोरोना रुग्णांचं सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणातून दिलासादायक बातमी समोर आली आहे.

मुंबईत काही लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही. मात्र कोरोना लसीचा पहिला डोसही अधिक चांगलं काम करत असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

हेही वाचा- लवकरच होणार अंधेरी स्टेशनचा कायापालट, कसं असेल नवं स्टेशन बघा PHOTOS

2.9 लाख लोकांपैकी केवळ 26 जण कोरोनाची दोन्ही डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्याचबरोबर पहिल्या डोसनंतर 10 हजार 500 जणांना कोरोनाची लागण झाली. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2021 ते 17 जून 2021 या काळात मुंबईत सुमारे 40 लाख 75 हजार 393 लोकांनी लस घेतली. यापैकी केवळ 0.23% लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे.

हेही वाचा- Breaking News: जम्मूत मिलिट्री स्टेशनवर आढळलं ड्रोन, लष्कराकडून 25 राऊंड फायरिंग

मुंबई पालिकेच्या वॉर रूमने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, दुसर्‍या लाटेत मुंबईत 3.95 लाख नवीन रुग्ण आढळले. यापैकी वॉर रूमने 2.9 लाख रुग्णांशी संपर्क साधून त्यांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी बहुतेक रुग्ण होम आयसोलेशन असलेले रुग्ण होते. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 53.83 लाख लोकांनी लस घेतली आहे. त्यापैकी 10 लाख लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai muncipal corporation