मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यात दारूची होम डिलिव्हरी बंद, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

राज्यात दारूची होम डिलिव्हरी बंद, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

अजित पवार यांनी म्हटलं की, कोविडचे प्रमाण कमी असल्याने आम्ही दारूची होम डिलिव्हरी बंद करत आहोत. लॉकडाऊनच्या काळात ही व्यवस्था होती.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 2 जून : महाराष्ट्रात दारूची होम डिलिव्हरी (Home Delivery of Liquor) सेवा बंद करण्याच निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला आला. राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गृह विभागाने उत्पादन शुल्क विभागाला पत्र लिहून याबाबत सूचना दिल्या होत्या. अजित पवार यांनी म्हटलं की, कोविडचे प्रमाण कमी असल्याने आम्ही दारूची होम डिलिव्हरी बंद करत आहोत. लॉकडाऊनच्या काळात ही व्यवस्था होती. केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी डबल खूशखबर; प्रमोशन होणार आणि पगारही वाढणार? राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र लिहून आता दारूची होम डिलिव्हरी बंद करण्याबाबत सूचना केली होती. गृह विभागाचे म्हणणे आहे की लॉकडाऊन दरम्यान सोशल डिस्टन्सिंग सुनिश्चित करण्यासाठी होम डिलिव्हरी प्रणाली लागू करण्यात आली होती. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर दारूची होम डिलिव्हरी सुरू करण्यात आली होती. मात्र, ही डिलिव्हरी परवानाधारक दुकानांसाठी होती. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता केसेस कमी झाल्यामुळे सरकारने होम डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या गव्हात म्हणे व्हायरस! तुडवडा असताना 'या' देशाने नाकारली भारताकडून मिळालेली गव्हाची खेप राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  म्हटले की, सध्या कोरोनाबाधित वाढत असून ही काळजीची बाब आहे. मास्क वापरणे गरजेचं असून राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मागील अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
First published:

Tags: Ajit pawar

पुढील बातम्या