Home /News /mumbai /

वांद्र्यात कामगारांचा उद्रेक, अफवा पसरविणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार – अनिल देशमुख

वांद्र्यात कामगारांचा उद्रेक, अफवा पसरविणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार – अनिल देशमुख

'महाराष्ट्रात अडकलेल्या सर्व कामगारांची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही काळजी करू नका. या गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका.'

    मुंबई 14 एप्रिल: लॉकडाऊन संपल्यानंतर काही ट्रेन्स सुरू होणार अशी चुकीची माहिती पसरल्यामुळे वांद्र्यात कामगारांचे उद्रेक झाला अशी माहिती आता पुढे आली आहे. देशभर लॉकडाऊन असताना एवढ्या लोकांचं एकत्रित येणं यामुळे करोना विरुद्धच्या लढ्याची धार कमी होऊ शकते. त्यामुळे अफवा पसरविणाऱ्यांची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. आज वांद्रे स्टेशनच्या जवळ मोठ्या संख्येने तरुण जमले होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अशी आगलावी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करू असा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, कोरोनाविरुद्धचा लढा गांभीर्याने घेतला पाहिजे. लॉकडाऊन वाढवला त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. मी त्याबद्दल पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रात चाचण्या सर्वात जास्त होत आहे. त्यामुळे आपले आकडेही वाढत आहे. आम्ही अतिशय खंबीरपणे याचा सामना करतोय आणि पुढेही करत राहू असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अडकलेल्या सर्व कामगारांची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही काळजी करू नका. या गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका, असं काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. कोरोनाच्या लढ्यात पैसे इथून काढा, तिथून काढा असे सूचवत आहेत. पैसे कुठून आणि कसे काढायचे ते आम्हाला कुणी सांगू नये असा टोलाही त्यांनी लगावला. दररोज 6 ते 7 लाख मजुरांना दररोज नाश्ता आणि जेवण देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काही तासांत काँग्रेस आमदार कोरोना पॉझिटिव्ह कोव्हिढ योद्ध्यासाठी नाव देण्याचं आवाहन केल्यानंत 21 हजार लोकांनी नावं नोंदवलं अशी माहिती त्यांनी दिली. प्लाझ्मा ट्रिटमेंट आणि बीसीजी लसीचा प्रयोग करण्याची परवानगी द्यावी अशी आम्ही विनंती केंद्राला केली आहे. ती परवानगी मिळली तर प्रयोगाला सुरुवात होईल. कोरोनानंतर आर्थिक आघाड्यांवर कसं पुढे जायचं यावर अर्थतज्ज्ञांची एक समिती तयार केली असून ती सरकारला सल्ला देणार आहे. महाराष्ट्रात 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाला प्रवेश करू दिला नाही. शेतकऱ्यांना कुणीही थांबवणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 20 तारखेनंतर काय काय सुरू करता येईल याचा सरकार अंदाज घेत आहे. मुख्यमंत्री म्हणाले, आज कोरोनामुक्त झालेल्या दोन जणांशी बोललो. 6 महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरवलं. त्याच्या आईशी मी बोललो. त्यानंतर 83 वर्षांच्या आजीबाईंशी मी बोलललो. कोरोनावर मात करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला आहे. ते कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांसाठी सल्ला देणार आहेत. लॉकडाऊन: नवरा बायको घरीच असल्याने 'फोन'मुळे बिंग फुटले, अफेअर्स चव्हाट्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरुद्ध लढाई दिली आता विषाणूसोबत लढाई आहे. या लढाईत भीमसैनिकांचं योगदान आहे त्यांना धन्यवाद.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Anil deshmukh

    पुढील बातम्या