जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / युक्रेन-रशियाच्या यु्द्धकुंडातून भारतीयांच्या सुटकेचा थरार छोट्या पडद्यावर; History TV18 वर होणार प्रीमिअर

युक्रेन-रशियाच्या यु्द्धकुंडातून भारतीयांच्या सुटकेचा थरार छोट्या पडद्यावर; History TV18 वर होणार प्रीमिअर

युक्रेन-रशियाच्या यु्द्धकुंडातून भारतीयांच्या सुटकेचा थरार छोट्या पडद्यावर; History TV18 वर होणार प्रीमिअर

रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिस्थिती आली होती, याची इत्थंभूत माहिती ही डॉक्युमेंटरी देते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 15 जून : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तिथे असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारताने मोठी मोहीम हाती घेतली. ऑपरेशन गंगा ही एकविसाव्या शतकातली सर्वांत मोठी मोहीम आहे. अनेक थरारक घटनांनी भरलेली आहे. या मोहिमेबाबत एक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली आहे. ‘द इव्हॅक्युएशन – ऑपरेशन गंगा’ असं तिचं नाव आहे. भारतीय सरकारनं युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना कसं सोडवलं हे सांगणारी ही डॉक्युमेंटरी आहे. हिस्ट्री टीव्ही 18 नं आज (15 जून 2023) या डॉक्युमेंटरीच्या लाँचबाबत माहिती दिली. 17 जूनला त्याचा प्रीमिअर पाहता येईल. रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिस्थिती आली होती, याची इत्थंभूत माहिती ही डॉक्युमेंटरी देते. बंकरमध्ये राहिलेल्या विद्यार्थ्यांना अन्न-पाणी गरजेच्या गोष्टीही मिळत नव्हत्या. त्यांचे पालक मुलांची आतुरतेने वाट पाहत होते. या परिस्थितीत भारत सरकारने खूप प्रयत्न करून या विद्यार्थ्यांना मायदेशी आणलं. ही डॉक्युमेंटरी युक्रेनमधली बिघडत चाललेली परिस्थिती आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दाखवताना प्रत्येक भारतीयाला मायदेशी परत आणण्याचं एकच उद्दिष्ट असलेल्या मोठ्या बचाव मोहिमेचा उलगडा करते. यात तपशील उलगडून दाखवणारं फुटेज आणि माहीत नसलेल्या अनेक घटना सांगणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवांमुळे ही डॉक्युमेंटरी एक जबरदस्त अनुभव देते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परत आणण्याचे सरकारचे उल्लेखनीय प्रयत्न दाखवते. माध्यम समालोचक आणि संरक्षण तज्ज्ञ मरूफ रझा यांनी या डॉक्युमेंटरीमध्ये घटनांचं वर्णन केलं आहे.

    युक्रेन-रशिया संघर्ष सुरू होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. त्याचे परिणाम जगभरात जाणवू लागले आहेत. त्या वेळी सक्रिय युद्धक्षेत्रात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. ‘द इव्हॅक्युएशन’ ही डॉक्युमेंटरी भारताच्या अदम्य भावनेवर आणि प्रत्येक भारतीय नागरिकाच्या सुरक्षित परतीची खात्री करण्याच्या भारत सरकारच्या संकल्पावर प्रकाश टाकते. या मिशनचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. ऑपरेशन गंगा कसं आखलं गेलं, त्यांच्यासाठी व देशासाठी हे मिशन कसं महत्त्वाचं होतं, हे या डॉक्युमेंटरीमध्ये पंतप्रधानांनी सांगितलं आहे. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांचं सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि त्यांना सुरक्षितपणे घरी परत आणेल हा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. केवळ धोरण म्हणून सरकारचं काम नाही, तर मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न आहेत. ही भावना वेळोवेळी दृढ झाली आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी या डॉक्युमेंटरीमध्ये सांगतात. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या डॉक्युमेंटरीत पडद्यामागच्या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. भारताच्या परराष्ट्र सेवेतल्या इतर महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे राहुल श्रीवास्तव (रोमानिया, मोल्दोव्हा आणि अल्बेनियामधील भारताचे राजदूत), नगमा मलिक (पोलंड प्रजासत्ताक आणि लिथुआनिया प्रजासत्ताकमधील भारताच्या राजदूत), पार्थ सत्पथी (युक्रेनमधील भारताचे माजी राजदूत) यांनी भारत सरकारनं केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला आहे. अत्यंत खडतर हवामान, व्हिसाचे कठोर नियम आणि इतर सर्व अडचणी असूनही भारतीय अधिकाऱ्यांनी अडकलेल्या भारतीय नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. (विमान दुर्घटनेत आईला गमावलं, 40 दिवस 4 चिमुकल्यांनी जंगलात काढले; कसे जगले?) “युक्रेनमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी आम्ही पोलंड, स्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया आणि माल्दोव्हा या शेजारच्या देशांची मदत घेतली. पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी संवाद साधून बचाव मोहिमेवेळी युद्धविराम मिळण्यासंदर्भात मागणी केली. जगातले अनेक देश त्यांच्या नागरिकांच्या बचावासाठी झगडत असताना भारतानं 90 विमान उड्डाणांच्या मदतीनं भारतीय विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली. जागतिक स्तरावर सकारात्मक परिणाम घडवण्यात आपल्या देशाचा आवाज निर्णायक भूमिका बजावत आहे,” असं डॉ. एस. जयशंकर यांनी भारताच्या प्रयत्नांबाबत सांगितलं आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये विशेष दूत आणि काही वरिष्ठ मंत्री यांचाही समावेश आहे. युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये जाण्यासाठी सीमा ओलांडण्याचे प्रयत्न कसे यशस्वी झाले, त्यासाठी कोणाकोणाचे सहकार्य मिळाले, याबाबत हरदीप पुरी (केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री), जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह (रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री) तसंच किरेन रिजिजू (मिनिस्टर ऑफ अर्थ सायन्सेस) यांनी माहिती दिली आहे. (मध्यरात्री नदीत उलटली नाव, 100 जणांचा मृत्यू; लग्न सोहळ्याहून परतताना दुर्घटना) युक्रेनमधल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या चार भारतीय मत्र्यांपैकी एक होते केंद्रीय नागरी उड्डाण आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे. त्यांनी या डॉक्युमेंटरीमध्ये भारताच्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. ते सांगतात, “पंतप्रधानांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व धोरण आखण्यासाठी बैठक बोलावली होती. सर्व भारतीय नागरिक व विद्यार्थी सुखरूप परत यावेत, अशा त्यांच्या स्पष्ट सूचना होत्या. त्यासाठीची जबाबदारी आमच्यावर सोपवली होती. युक्रेनमधून भारताकडे जाणारं शेवटचं विमान निघेपर्यंत आम्ही तिथेच राहायचं होतं.” फेब्रुवारी 2022मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून त्यानंतरच्या बचाव मोहिमेपर्यंत ही डॉक्युमेंटरी सर्व घटनांवर प्रकाश टाकते. Colosceum Mediaची निर्मिती असलेल्या ‘द इव्हॅक्युएशन – ऑपरेशन गंगा’ या डॉक्युमेंटरीचा प्रीमिअर 17 जूनला हिस्ट्री टीव्ही 18 वर 8 वाजता होणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात