वृक्षतोड करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? हायकोर्टाने वीज कंपन्या फटकारले

एखाद्या वृक्षाच्या फांद्या तोडायच्या असतील तर त्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते ती ठरवली आहे का? असा सवाल कोर्टाने केल्यावर वीज कंपन्यांकडे कोणतंही उत्तर नव्हतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2018 09:54 PM IST

वृक्षतोड करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी?  हायकोर्टाने वीज कंपन्या फटकारले

मुंबई, ता. १८ जुलै : मुंबईतील खासगी वीज कंपन्या आणि रेल्वे या सरसकट वृक्षतोड कशा काय करु शकतात? असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारला आहे. एखाद्या वृक्षाच्या फांद्या तोडायच्या असतील तर त्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते ती ठरवली आहे का? असा सवाल कोर्टाने केल्यावर वीज कंपन्यांकडे कोणतंही उत्तर नव्हतं. आम्हाला काही वेळ देण्यात यावा अशी विनंती या कंपन्यांतर्फे कोर्टाला करण्यात आली असून, ती कोर्टाने मान्य केली आहे.

एखाद्या वृक्षाची एखादी फांदी तोडायची असल्यास ती फांदी मृत झाली आहे का? ती फांदी खरोखरच वीज कंपन्या किंवा रेल्वेसाठी धोकादायक होऊ शकते का? हे ठरवण्यासाठी वनस्पतीशास्रातील किंवा इतर क्षेत्रातील मदत घेतली जाते का? असे सवालही कोर्टाने केले आहेत. एखाद्या वृक्षाच्या अनेक फांद्या छाटल्या तर ते झाड पूर्णपणे तोडलं गेल्यासारखंच आहे, असं मत कोर्टाने व्यक्त केलयं. याचिकाकर्ते झोरु बाथेना यांनी या संस्था वर्षातून एकदा परवानगी घेतात आणि वर्षभर वृक्षांची छाटणी करतात असा दावा केला. आता या प्रकरणाची सुनावणी पुढील बुधवारी ठेवण्यात आली आहे.

युरोपीयन युनियनचा 'गुगल'ला 34 हजार कोटींचा दंड, अॅंड्रॉईडच्या गैरवापराचा आरोप

बहुतांश वृक्षलागवड ही शहराच्या बाहेर केली जात असल्याने आणि वृक्षतोड शहरात होत नसल्याने गेल्या काही वर्षांत मुंबई आणि मुंबईच्या उपनगरीय शहराचे तापमान वाढीस लागले आहे. औद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत मेट्रो आणि मोनो सारख्या प्रकल्पांची त्यात भर पडली आहे. उत्तरोत्तर वाहनांच्या प्रदुषणामुळे होत अललेली वाढ या सर्व गोष्टींसाठी कारणीभूत ठरत आहे. त्यात सुरु असलेली वृक्षतोड ही धोकादायक ठरु शकते असे हायकोर्टाने म्हणटले आहे.

तुमच्या पगारात होणार कपात,सॅलेरी स्लिपही बदलणार ?

Loading...

मेट्रो-3 चे काम रात्रीच्या वेळेस नाहीच – हायकोर्ट

..अन्यथा या सरकारला आरबी समुद्रात बुडवू - परळीत मराठा समर्थक आक्रमक

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 09:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...