जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अद्यापही संकट टळलं नाही, पुढील 3 ते 4 दिवस हवामान विभागाकडून अलर्ट जारी

अद्यापही संकट टळलं नाही, पुढील 3 ते 4 दिवस हवामान विभागाकडून अलर्ट जारी

अद्यापही संकट टळलं नाही, पुढील 3 ते 4 दिवस हवामान विभागाकडून अलर्ट जारी

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. निसर्गाचं अनोखं रूप आता पाहायला मिळत आहे. वर्षाविहाराचा आनंद घेण्याठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जुलै : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यानंतरचे काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे नद्या, नाल्यांना पुर आले. तर काही धरणेही भरली. तसेच राज्यात झालेल्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. हवामान खात्याने काय म्हटलं - राज्यातील पावसाची परिस्थिती कशी राहणार, याबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पुढील 4, 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. तसेच येत्या ३ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

जाहिरात

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी थांबाल तर …

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. निसर्गाचं अनोखं रूप आता पाहायला मिळत आहे. वर्षाविहाराचा आनंद घेण्याठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. अनेक पर्यटक पर्यंटन स्थळांना भेट देत आहेत. त्यातच आता पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर थांबून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर थांबून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेणार असाल तर जरा थांबा. कारण द्रुतगती मार्गावर थांबणं तुम्हाला महागात पडू शकते. पुणे जिल्ह्यासह मावळात मुसळधार पाऊस सुरू आहे. द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूनी छोटे, मोठे नैसर्गिक धबधबे वाहत आहेत. ते आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी किंवा सोबत फोटो काढण्यासाठी पर्यटक थांबतात. हेही वाचा -  मोठी दुर्घटना! 10 जणांना घेऊन जाणारी बोट पलटली; 8 जण बेपत्ता तर दोघांचा जीव वाचला आता हे थांबणं त्यांना चांगलंच महागात पडू शकते. कारण असे आढळून आल्यास त्यांच्यावर MSRDC दंडात्मक कारवाई करणार आहे. अनेकदा असे थांबणे अपघाताला निमंत्रण असू शकते म्हणून दंडात्मक कारवाईचा बडगा MSRDC उगारणार आहे. तशी पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात