जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / गुरू माँ कांचनगिरी राज ठाकरेंच्या भेटीला कृष्णकुंजवर,भेटीवर महापौर किशोरी पेडणेकरांचं आक्रमक उत्तर

गुरू माँ कांचनगिरी राज ठाकरेंच्या भेटीला कृष्णकुंजवर,भेटीवर महापौर किशोरी पेडणेकरांचं आक्रमक उत्तर

गुरू माँ कांचनगिरी राज ठाकरेंच्या भेटीला कृष्णकुंजवर,भेटीवर महापौर किशोरी पेडणेकरांचं आक्रमक उत्तर

आज गुरू माँ कांचनगिरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर: आज गुरू माँ कांचनगिरी (Guru Maa Kanchangiri) आणि जगतगुरू सूर्याचार्य (Jagatguru Suryacharya) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे सोबत आलेल्या गुरू माँ कांचनगिरी यांनी कुणाची तरी सुपारी घेऊन काम करू नये असं आक्रमक उत्तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे आणि गुरू माँ कांचनगिरी यांच्या भेटीवर दिलं आहे.

जाहिरात

गुरू माँ कांचनगिरी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांची घेतलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसंच, गुरू माँ कांचनगिरी यांनी राज ठाकरेंना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. येत्या दिवाळीत राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचं आदरातिथ्य केलं. कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र भेट म्हणून दिलं आहे. राज ठाकरे आणि कांचन गिरी यांच्यात तब्बल अर्धा तास बैठक झाली. हेही वाचा-  T20 World Cup: अडचणीत सापडलेल्या हार्दिक पांड्याला आठवला धोनी! म्हणाला… महापौरांचा भाजप पदाधिकाऱ्यांवर निशाणा मुंबई महापालिकेवर भ्रष्ट्राचारांचे आरोप करणाऱ्यांनी आधी स्वत:चे नगरसेवक पद धोक्यात आलंय ते सांभाळांवं त्यानंतर शिवसेनेवर पुराव्यानिशी आरोप करावेत असेही महपौर किशोरी पेडणेकर यांनी आरोप करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात