मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

भाजपच्या निलंबित आमदारांसाठी राज्यपालांनी 3 पत्र मिळूनही केली नाही सही, निवडणूक लांबणीवर?

भाजपच्या निलंबित आमदारांसाठी राज्यपालांनी 3 पत्र मिळूनही केली नाही सही, निवडणूक लांबणीवर?

 याचाच दाखला देत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी विधानसभा निवडणुकीला परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.

याचाच दाखला देत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी विधानसभा निवडणुकीला परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.

याचाच दाखला देत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी विधानसभा निवडणुकीला परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 27 डिसेंबर : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून ( Assembly Speaker Election) आता महाविकास आघाडी सरकार (mva government) आणि राज्यपाल (governor bhagat singh koshyari) यांच्यात नवीन वाद पेटला आहे. राज्य सरकारने तीन पत्र पाठवून सुद्धा राज्यपालांनी सही केली नाही, अशी माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबद्दल कार्यक्रम सुद्धा जाहीर केला आहे. राज्यपालांकडे पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आणि छगन भुजबळ यांनी राजभवनावर जाऊन भेट सुद्धा घेतली. राज्यपालांनी तांत्रिक कारण सांगत एक दिवस मागून घेतला होता. पण आज पुन्हा पत्र पाठवण्यात आले. आतापर्यंत राज्यपालांना तीन पत्र पाठवण्यात आले आहे. पण अजूनही राज्यपालांनी अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत उत्तर दिलं नाही.  विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सरकारने 3 पत्र राज्यपालांना लिहिली.  एक पत्र शुक्रवारी दुपारी पाठवले होते. तर   दुसरं पत्र नेत्यांनी रविवारी स्वतः दिलं  आणि आज तिसरं पत्र दुपारी पाठवलं आहे. पण अजूनही उत्तर न आल्याने अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमयावर अजूनही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

(हेही वाचा - जुन्या कंपनीचा PF बॅलन्स सोप्या पद्धतीने 'असा' करा ट्रान्सफर; जाणून घ्या Process)

विशेष म्हणजे,  भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे.  निलंबित असताना आमचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात आहे. मतदान करणे हा आमचा संवैधानिक अधिकार आहे, असं या पत्रात नमूद केलं आहे.

तसंच, याचबरोबर अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर आमचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा अशीही विनंती या १२ आमदारांनी केली आहे.

याचाच दाखला देत राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी विधानसभा निवडणुकीला परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी सुद्धा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडेही पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती.

 'राज्यपालांच्या आडून भाजपचा छुपा अजेंडा - नाना पटोले

दरम्यान, 'आवाजी मतदान पद्धतीनेच होईल व उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे. विधिमंडळाने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नाही. राज्यपालांच्याआडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाकडून अडथळा आणत आहे, असा आरोपच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

(हेही वाचा - Winter | हिवाळ्यात पाऊस पडतो तेव्हा हवामानावर काय परिणाम होतो?)

'नियम बदलण्याचे अधिकार विधिमंडळाला आहेत, त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे नियम बदल करण्यात आले आहेत. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे तीच प्रक्रिया महाराष्ट्राने स्विकारलेली आहे. इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते. महाराष्ट्रातही विधान परिषद सभापतींची निवडणूक आवाजी पद्धतीनेच होते. त्यामुळे विधिमंडळाने घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसून तसे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल,असं पटोले म्हणाले.

तसंच, 'राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष छुपा अजेंडा राबवत असल्याचे उघड झाले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा जाणीवपूर्वक यात अडथळा आणत आहे. भाजप सरकारने लोकसभेत तीन वर्षात उपाध्यक्षपदाची निवडणुक घेतलेली नाही, त्यांचा खरा चेहरा जनतेला माहित आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली.

First published: