मराठी बातम्या /बातम्या /मनी /

जुन्या कंपनीचा PF बॅलन्स सोप्या पद्धतीने 'असा' करा ट्रान्सफर; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

जुन्या कंपनीचा PF बॅलन्स सोप्या पद्धतीने 'असा' करा ट्रान्सफर; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

घरच्या घरी बसून ऑनलाइन EPF ट्रान्सफर करणं शक्य आहे.

घरच्या घरी बसून ऑनलाइन EPF ट्रान्सफर करणं शक्य आहे.

घरच्या घरी बसून ऑनलाइन EPF ट्रान्सफर करणं शक्य आहे.

मुंबई, 27 डिसेंबर: एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड अर्थात ईपीएफ (EPF Account Transfer) हा कर्मचाऱ्यांच्या पगारामधला महत्त्वाचा भाग असतो. कर्मचाऱ्यांच्या भविष्यकालीन गरजांसाठी दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून ही रक्कम कापली जाऊन ईपीएफ खात्यात भरली जाते आणि तेवढीच रक्कम कंपनीकडूनही कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यात (EPF Account) जमा केली जाते. एक कंपनी बदलून एखादा कर्मचारी दुसऱ्या कंपनीत जॉइन झाला, तर त्या वेळी आधीच्या कंपनीतून जमा झालेला पीएफ दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर करावा लागतो. काही वेळा काही जण ते विसरतात आणि नंतर ते जेव्हा लक्षात येतं, तेव्हा त्यांना असं वाटतं, की आता EPF ऑफिसमध्ये प्रत्यक्ष गेल्याशिवाय काम होणार नाही. वास्तविक तसं नाही. आधीच्या कंपनीचा EPF बॅलन्स घरबसल्या विद्यमान कंपनीत ट्रान्सफर करणं शक्य आहे. याच्या ऑनलाइन प्रक्रियेविषयीची माहिती EPFO अर्थात एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने ट्विट करून दिली असून, 'झी न्यूज'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

जुना EPF बॅलन्स नव्या कंपनीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी अॅक्टिव्ह UAN नंबर आणि पासवर्ड या दोन बाबी असणं अत्यावश्यक आहे. UAN नंबरवर कर्मचाऱ्याचा बँक अकाउंट नंबर, मोबाइल नंबर, आधार नंबर आदी माहिती अपडेट असणं आवश्यक आहे. तरच घरच्या घरी बसून ऑनलाइन EPF ट्रान्सफर करणं शक्य आहे.

Gold Price Today: सोने चांदीच्या दरात चढ-उतार सुरुच, चेक करा आजचे नवे दर

जुना EPF नव्या कंपनीत ट्रान्सफर करण्यासाठी...

1. जुन्या कंपनीने आपली एंट्री डेट आणि एक्झिट डेट अपडेट केली आहे ना, याची खात्री कर्मचाऱ्याने करावी. त्यासाठी EPFO च्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या अधिकृत वेबसाइटवर जाणं आवश्यक आहे. त्यासाठी View मध्ये जाऊन Service History वर क्लिक करावं.

2. जुन्या कंपनीने या दोन्ही तारखा अपडेट केल्या असतील, तर PF अगदी सहजपणे ट्रान्सफर होईल. तसं नसेल तर मात्र अडचणी येऊ शकतात.

3. Online Services मध्ये जाऊन One Member One EPF Account (Transfer Request) या पर्यायावर क्लिक करावं.

4. त्यानंतर नवं पेज ओपन होईल. तिथे पर्सनल इन्फॉर्मेशन मिळेल. तसंच विद्यमान कंपनीच्या PF अकाउंटचे डिटेल्स मिळतील. त्या अकाउंटमध्ये जुन्या अकाउंटमधले पैसे येतील.

5. त्याच्या खाली जुन्या कंपनीचे डिटेल्स असतील, जिथून PF ट्रान्सफर करायचा आहे. या पीएफ ट्रान्सफरला जुन्या किंवा नव्या कंपनीकडून मंजुरी मिळवावी लागते. नव्या कंपनीकडून मंजुरी मिळवणं सोपं असतं. तो पर्याय निवडावा.

6. त्यानंतर UAN डिटेल्स द्यावेत. त्यानंतर आधीच्या साऱ्या कंपन्यांचे PF आयडी येतील. ज्या कंपन्यांमधला पीएफ ट्रान्सफर करायचा असेल, त्या सर्व कंपन्या सिलेक्ट कराव्यात.

7. त्यानंतर वन टाइम पासवर्डद्वारे ते ऑथेंटिकेट करावं लागतं.

8. THE CLAIM HAS BEEN SUCESSFULLY SUBMITTED असा मेसेज त्यानंतर दिसतो.

9. त्यानंतर ट्रान्सफर क्लेम स्टेटस दिसतं. अटेस्टेशनसाठी एक प्रिंट काढून कंपनीला द्यावी लागते. कंपनी ते पीएफ ऑफिसला पाठवते.

10. 7 ते 30 दिवसांत जुना पीएफ बॅलन्स नव्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतो.

PF मधील पैसे शिक्षण, लग्न, घर खरेदीसाठी काढता येईल; वाचा EPFO चे नियम

जुन्या PF अकाउंटचा बॅलन्स पाहण्यासाठीदेखील https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाइटवर जावं लागतं.

मेंबर्स प्रोफाइलमध्ये नाव, आधार डिटेल्स, पॅन कार्ड आदी डिटेल्स व्हेरिफाय करावी लागतात. ई-मेल आयडी, मोबाइल नंबर, बँक अकाउंट डिटेल्स आदी माहितीही योग्य भरलेली असावी लागते.

View Passbook या पर्यायावर जाऊन पासबुक चेक करता येतं.

First published:

Tags: Epfo news, Money