मुंबई, 04 नोव्हेंबर: हल्ली सोशल मीडियावर हिट होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. कधीकधी लाइक्स मिळवण्याच्या नादात लोकं वेडेपणा करुन बसतात आणि याचे त्यांना वाईट परिणाही सहन करावे लागतात. असाच प्रकार अमेरिकेत घडला आहे. यूट्यूब चॅनलवर काहीतरी हटके करायचं या हेतूने एक महिला आपली जागा सोडून बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या मैत्रिणीच्या आसनाखाली लपायला गेली. आपल्या मैत्रिणीला घाबरवायचं आणि यूट्यूबवर काहीतरी वेगळं दाखवून लाइक्स मिळवायचे अशी या महिलेची कल्पना होती. विमान सुरू व्हायच्या आधी एक महिला आपल्या जागेवर नाही. तिची पर्स फक्त त्या जागी आहे हे केबीन क्रूच्या लक्षात आलं. केबीन क्रूने आजूबाजूच्या प्रवाशांना विचारलं असता ती पर्स ठेऊन गेली पण कुठे गेली याची कल्पना नाही. असं उत्तर विमानातल्या लोकांनी दिलं. महिला गायब झाल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. तिची शोधा-शोध सुरू झाली. एक महिला प्रवासी आपल्या स्थानावर गायब आहे. ती येईपर्यंत विमान टेक ऑफ करणार नाही अशी अनाऊन्संमेंट केबीन क्रूने केली. अखेर घाबरलेल्या महिलेनं मस्करी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि ती मैत्रिणीच्या आसनाखालून बाहेर आली. महिला आपल्या आसनावर गूपचूप जाऊन बसण्याचा प्रयत्न करत असतानाचा केबिन क्रूने तिला पकडलं. आणि झालेल्या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यावर तिने उत्तर दिलं की, मी केवळ माझ्या मैत्रिणीची मस्करी करण्यासाठी हा सगळा प्रकार केला. त्यावेळी केबीन क्रूने या महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला विमानातून खाली उतरवलं. यावर, आपली काही चूक नसताना मला विमानातून खाली उतरवलं जात आहे असं ती महिला म्हणाली. मी तिकिटाचे पूर्ण पैसे भरले आहेत त्यामुळे मला विमानात प्रवास करायला दिलाच पाहिजे असंही तिचं म्हणणं होतं. पण संतापलेल्या फ्लाईट कर्मचाऱ्यांनी तिला विमानातून बाहेर उतरवलं. या महिलेच्या वेडेपणामुळे विमानाचं उड्डाण तीन तास उशिरा झालं.अमेरिकन एअर-लाइन्सच्या एए 2205 या विमानामध्ये ही घटना घडली. हे विमान फोर्ट वर्थहून मियामीकडे जात होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.