मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

खाजगी बसमध्ये महाकाय अजगराचा सीटखाली बसून 300Km प्रवास; मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची भयावह अवस्था

खाजगी बसमध्ये महाकाय अजगराचा सीटखाली बसून 300Km प्रवास; मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची भयावह अवस्था

तब्बल 14 फूट लांब अजगराने बसमध्ये सीटच्या खाली बसून तब्बल 300 किमी प्रवास केला.

तब्बल 14 फूट लांब अजगराने बसमध्ये सीटच्या खाली बसून तब्बल 300 किमी प्रवास केला.

तब्बल 14 फूट लांब अजगराने बसमध्ये सीटच्या खाली बसून तब्बल 300 किमी प्रवास केला.

  • Published by:  Meenal Gangurde

उदयपुर, 28 नोव्हेंबर : तुम्ही चार्टर्ड बसमध्ये (Chartered Bus) आनंदात प्रवास करीत असाल आणि अचानक तुम्हाला कळालं की, या बसमध्ये 14 फूच लांब अजगरही (14 feet long python) सहप्रवासी होऊन प्रवास करीत आहे, तर तुमची काय अवस्था होईल? अशीच काहीशी घटना उदयपूरहून मुंबईला जाणाऱ्या चार्टर्ड बसमधील प्रवाशांनी अनुभवला आहे. अजगरसह 300 किमीपर्यंत प्रवास केल्यानंतर प्रवाशांना अजगराविषयी कळताच बसमध्ये खळबळ उडाली. कसंबसं प्रवाशांना सांभाळण्यात आलं आणि अहमदाबाद (Ahemdabad) मधील एका ढाब्याजवळ बस थांबवण्यात आली. त्यानंतर पुढील अर्ध्या तासात अजगराला रेस्क्यू करण्यात आलं. (giant python sitting under a seat in a private bus Terrible condition of passengers coming to Mumbai)

उदयपुरमधून शुक्रवारी रात्री प्रवाशांना घेऊन फाल्कन ट्रॅव्हल्सची एक चार्टर्ड बस मुंबईला जात होती. यात उदयपुर, सलूंबर, गिंगला, मेवल आणि जयसमंद भागातील प्रवासी प्रवास करीत होते. या बसमध्ये प्रवाशांसह 14 फूट लांब अजगरदेखील प्रवास करीत होता आणि त्याने 300 किमीपर्यंतचा प्रवासदेखील केला होता. याबद्दल कळताच अहमदाबादमधील एका ढाब्याजवळ बस थांबवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार एका प्रवाशाची नगर बसमधील सीटच्या खाली बसलेल्या अजगराकडे गेली. यानंतर पुढील 15 मिनिटं बसमध्ये गोंधळ उडालाय. प्रवाशी गोंधळ घालू लागले आणि बसच्या बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागले.

हे ही वाचा-वाघाच्या मावशीचं खतरनाक रूप! मांजराने चक्क सापाला अक्षरश: चावून चावून खाल्लं

गोंधळामुळे डिक्कीत शिरला अजगर..

यादरम्यान काही प्रवाशांनी लूटची शक्यता व्यक्त केली. दुसरीकडे गोंधळ वाढल्यामुळे अन्य वाहन चालकांसह लोकही एकत्र आले. यादरम्यान अजगर बसच्या साइड डिक्कीत शिरला. लोकांनी तब्बल अर्ध्या तासानंतर अजगराला बाहेर काढलं आणि सुरक्षित जंगलात सोडून दिलं. अजगर पकडला गेल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही प्रवासी मुंबईत पोहोचलेपर्यंत भीतीच्या सावटाखाली होते.

तस्करीची शक्यता व्यक्त केली जात आहे..

या प्रकरणात काही प्रवाशांनी वन्यजीव तस्करीची शक्यता व्यक्त केली. त्यांचं म्हणणं आहे की, जयसमंद ते अहमदाबादपर्यंत तब्बल 300 किमी दरम्यान अजगरचा कोणताही वावर दिसला नाही आणि कोणालाही कळालं नाही.

अहमदाबादमध्ये हॉटेलमध्ये बस थांबली तेव्हा त्याबाबत कळालं. हा अजगर चार्टर्ड बसमध्ये कसा चढला असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

First published:

Tags: Mumbai, Private bus, Python