मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वाघाच्या मावशीचं खतरनाक रूप! मांजराने चक्क सापाला अक्षरश: चावून चावून खाल्लं

वाघाच्या मावशीचं खतरनाक रूप! मांजराने चक्क सापाला अक्षरश: चावून चावून खाल्लं

साध्या मांजराने सापाची (Cat and snake video) वाट लावली आहे.

साध्या मांजराने सापाची (Cat and snake video) वाट लावली आहे.

साध्या मांजराने सापाची (Cat and snake video) वाट लावली आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 25 नोव्हेंबर : मांजर (Cat video) कुणाची शिकार करतं असं विचारलं तर साहजिकच आपण उंदीर म्हणून. मांजर (Cat fight video) आणि उंदीर यांची लढाई तर आपल्याला माहितीच आहे (Animal fighting video). अगदी टॉम अँड जेरीसारख्या कार्टुनमुळे लहान मुलांनाही मांजर-उंदीर एकमेकांचे कसे शत्रू आहेत हे माहिती आहे (Animal video). पण उंदराची शिकार करणारी ही मांजर उंदराचीच शिकार करणाऱ्या सापाची (Cat and snake video) शिकार करताना दिसली. काय तुम्हाला आश्चर्य वाटलं ना?

साप आणि मुंगूसाची लढाई तुम्ही बरीच पाहिली असेल. हल्ली सोशल मीडियावर (Social media) मांजर आणि सापाच्या लढाईचेही (Cat snake fighting video) व्हिडीओ व्हायरल (Viral video) होताना दिसतात. या व्हिडीओत तुम्हाला मांजर सापावर फक्त पंजा मारून प्रतिकार करताना दिसली असेल (Cat attacking on snake). पण या व्हिडीओत मात्र मांजराने सापाला आपल्या तोंडात धरून अक्षरशः चावून चावून खाल्लं आहे (Cat eating snake).

View this post on Instagram

A post shared by Dunia hewan (@duniah.hewan)

मांजराला वाघाची मावशी म्हटलं जातं. पण याच मावशीचं खतरनाक रूप या व्हिडीओत दिसतं. व्हिडीओ पाहून या मावशीने वाघालाही मागे टाकलं असंच तुम्ही म्हणाल. duniah.hewan इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हे वाचा - फणा VS पंजा; मांजर आणि सापातील जबरदस्त फायटिंगचा थरार; पाहा VIDEO

साप जो विषारी असतो. त्याचा एकच दंश पुरेसा असतो. तितकाच तो सरपटणारा असल्याने चपळ आणि वेगवानही असतो. पण अशा सापाशी साध्या मांजराने पंगा घेतला आहे. तिने सापाचं तोंड आपल्या तोंडात घट्ट धरून ठेवलं आणि जणू काही उंदराला खाते आहे, असं ती त्याला चावून चावून खाताना दिसते आहे.

सापाची मांजराने अक्षरशः वाट लावली आहे. साप आपल्या जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसतो आहे. मांजराच्या तोंडातून बाहेर पडण्यासाठी हालताल करताना दिसतो आहे. पण मांजराने त्याला इतकं घट्ट पकडलं आहे की तित्या तावडीतून सुटणं त्याला शक्यच होत नाही आहे.

हे वाचा - उंदराकडे पाहावं तसं सापाकडे टकामका पाहत होतं मांजर; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही उडाल

हे मांजर तसं तुम्ही आम्ही नेहमी पाहत असलेल्या साध्या मांजरासारखंच आहे. जे आपल्या क्युट वाटतं. पण या साधं मांजर सापावर भारी पडलं आहे. त्यामुळे या वाघाच्या मावशीला तुम्ही बिलकुल कमी समजू नका. वेळ पडल्यावर ती आपली खरी ताकद दाखवतेच.

First published:

Tags: Cat, Pet animal, Snake, Viral, Viral videos, Wild animal