Home /News /maharashtra /

Ganesh Chaturthi 2020 : तुमचा बाप्पाबरोबरचा Selfie पाठवा आणि मिळवा बक्षिसं

Ganesh Chaturthi 2020 : तुमचा बाप्पाबरोबरचा Selfie पाठवा आणि मिळवा बक्षिसं

तुम्ही केलेली बाप्पाची सजावट सगळ्यांनी पाहावी, त्याचं कौतुक व्हावं असं वाटतं ना? मग पाठवा तुमचा बाप्पाबरोबरचा सेल्फी.

    मुंबई, 22 ऑगस्ट : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने (Ganesh Chaturthi 2020) News18lokmat.com एक स्पर्धा घेऊन येत आहे. तुम्ही केलेली बाप्पाची सजावट सगळ्यांनी पाहावी, त्याचं कौतुक व्हावं असं वाटतं ना? Coronavirus साथीच्या काळातही तुमच्या गणपतीचं दर्शन जगाला होईल अशी स्पर्धा आम्ही घेऊन आलो आहोत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही फक्त एवढं करायचं की, बाप्पाबरोबरचा एक सेल्फी आम्हाला पाठवायचा. तुमचा सगळा परिवार या फोटो बाप्पासह दिसला तर उत्तमच. संबंधित- गणेशोत्सवात तुमची कौशल्य इथे दाखवा, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा फोटो अपलोड कुठे करायचे? स्पर्धेत सहभागी होण्यासाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटवर गणेशोत्सवानिमित्त स्वतंकत्र विभाग तयार केला आहे. त्यावर क्लिक करा. Selfie with Bappa चा विभाग तिथे दिसेल. एक छोटा फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव, इ मेल आणि मोबाईल नंबर लिहून तुमचा फोटो (.jpeg format )अपलोड करता येईल. आमच्या वेबसाइटवर गणेशोत्सवानिमित्त खास विभाग सुरू आहे. त्यामध्ये तुम्ही प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं आणि पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं LIVE दर्शन घेऊ शकता - अगदी 24 तास. याशिवाय तुमचा बाप्पा जगप्रसिद्ध करण्यासाठी आम्ही सेल्फी विथ बाप्पा ही स्पर्धा घेऊन आलो आहोत. तिथे तुमच्या फोटोग्राफीचं कौशल्य दाखवता येईल. हे फोटो आमचं परीक्षक मंडळ पाहील आणि त्यातून सर्वोत्कृष्ट फोटोची निवड करण्यात येईल. विजेत्यांना बक्षिसं दिली जातील.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या