Home /News /mumbai /

मुंबईतील प्रवेश महागला; 1 ऑक्टोबरपासून टोलदरात मोठी वाढ

मुंबईतील प्रवेश महागला; 1 ऑक्टोबरपासून टोलदरात मोठी वाढ

काय आहे नवीन दर? वाचा..

    मुंबई, 25 सप्टेंबर : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये काम बंद असल्याने आधीच सर्वसामान्यांचं कंबरड मोडलं आहे. त्यानंतर येत्या काळात खिसा आणखी रिकामा होण्याची चिन्हं आहेत. 1 ऑक्टोबरपासून मुंबईतील टोल दरात 5 ते 25 रुपयांनी दरवाढ होणार आहे. दर तीन वर्षांनी ही टोलच्या दरात वाढ होत असते त्यानुसार ही वाढ होत आहे. मुलुंड, वाशी, दहीसर, ऐरोली, लाल बहाहूर शास्त्री मार्गावर हे पाच टोल नाके आहेत. छोट्या वाहनांसाठी 40 रुपये, मध्यम अवजड वाहनांसाठी 65 रुपये, ट्रक आणि बसेससाठी 130 रुपये, तर अवजड वाहनांसाठी 130 रुपये इतका टोल असणार आहे. मासिक पासही 1400 रुपयांवरुन 1500 इतका करण्यात आला आहे. 2002 ते 2027 अशी 25 वर्षे उड्डाणुलांच्या देखभालीसाठी हा टोल वसुल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे ही वाचा-ठाकरे सरकार पाडण्याबद्दल फडणवीसांनी केला मोठा दावा, म्हणाले... मुंबईत खासगी वाहनाने ये-जा करणाऱ्यांना आता 1 ऑक्टोबरपासून वाढीव टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे आता मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात 5 ते 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai, Toll

    पुढील बातम्या