Home /News /mumbai /

फ्रान्स हल्ल्याचे मुंबईत पडसाद, रझा अकादमीने मॅक्रॉन यांचे पोस्टर पायदळी तुडवले

फ्रान्स हल्ल्याचे मुंबईत पडसाद, रझा अकादमीने मॅक्रॉन यांचे पोस्टर पायदळी तुडवले

भेंडी बाजार भागात फ्रान्सचे पंतप्रधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स रस्त्यावर पाहण्यास मिळाले.

    मुंबई, 30 ऑक्टोबर : फ्रान्सच्या नीस (Nice knife attack) शहरात एका माथेफिरू हल्लेखोराने अल्लाह अकबरचा नारा देत चर्चमध्ये घुसून चाकू हल्ला (france terrorism attack) केला होता. या घटनेचे पडसाद आता मुंबईतही उमटले आहे. मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रझा अकादमीकडून (raza academy ) फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे पोस्टर्स पायदळी तुडवण्यात आले आहे. मुंबईतील अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या भेंडी बाजार भागात फ्रान्सचे पंतप्रधान  फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांचे पोस्टर्स रस्त्यावर पाहण्यास मिळाले.  रस्त्यावर ठिकठिकाणी मॅक्रॉन यांचे पोस्टर लावण्यात आले होते. रझा अकादमीने हे कृत्य केले आहे. रझा अकादमीच्या या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपचे नेते संबित पात्रा यांनी या घटनेवरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. 'तुमच्या राज्यामध्ये नेमकं सुरू काय आहे? आज भारत हा फ्रान्सच्या सोबत उभा आहे. फ्रान्समध्ये ज्या प्रकार जिहादी कृत्य होत आहे, त्या दहशतवादाच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्ससोबत असल्याची ग्वाही दिली आहे. पण, दुसरीकडे मुंबईतील रस्त्यांवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा अपमान का केला जात आहे?' असा सवाल पात्रा यांनी उपस्थित केला आहे. नीसमध्ये काय झालं? दक्षिण फ्रान्समधल्या (France stabbing) नीस शहरात (Nice knife attack) मध्यवर्ती भागात असलेल्या नॉत्र दाम या चर्चाजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर अल्लाहू अकबरचा नारा देत सपासप वार करत राहिला, असं स्थानिक वृत्तसंस्थांनी म्हटलं आहे. या प्रकरणी एका संशयित हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. फ्रेंच वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत क्रूरपणे हा हल्ला झाला. गुरुवारी नाईस शहरातल्या नॉत्र दाम चर्चजवळच हल्लेखोरांनी चाकूने थेट हल्ला केला. यात एका महिलेचा शिरच्छेद करण्यात आला. आणखी एक जण रुग्णालयात दाखल करत असतानाच मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत. फ्रान्समध्ये काय सुरू आहे? काही दिवसांपूर्वीच फ्रान्समधल्या एका शालेय शिक्षाकाचा याच प्रकारे शिरच्छेद करण्यात आला होता.  चेचेन वंशाच्या एका व्यक्तीने शिक्षकाचा असा क्रूर खून करण्यामागचं कारण म्हणे मोहम्मद पैगंबरांचं व्यंगचित्र या शिक्षकाने नागरिक शास्त्राच्या तासाला वर्गात दाखवलं. या इस्लामविरोधी कामाची शिक्षा म्हणून त्याचा शिरच्छेद केल्याचं या चेचेन माथेफिरूने सांगितलं. सप्टेंबर महिन्यात पॅरिसमध्ये चार्ली हेब्दो या उपरोधिक मजकूर आणि व्यंगचित्र प्रसिद्ध करणाऱ्या मॅगझिनच्या ऑफिसजवळ असाच चाकू हल्ला झाला होता. त्यामागे दहशतवादी शक्ती असल्याची शक्यता तेव्हाही वर्तवण्यात येत होती. आता थेट नीस शहरातल्या नॉत्र दाम चर्चमध्ये हल्ला झाल्याने ही शक्यता बळावली आहे. नीस हल्ल्यामागे असंच काही आहे की आणखी वेगळं कारण याचा उलगडा अजून झालेला नाही. शिक्षकाच्या हत्येनंतर हा दहशतवादाचाच प्रकार असल्याचं जाहीर करत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी धर्मांध मुस्लिमांविषयी कडक धोरण असल्याचं जाहीर केल्यानंतर मुस्लीम देशांनी फ्रान्सचा निषेध केला होता. पैगंबरांच्या व्यंगचित्राची पाठराखण केल्याचा आरोप मॅक्रॉन यांच्यावर होत आहे. त्यामुळे अनेक मुस्लीम धर्मीयांचा त्यांनी रोष ओढवून घेतला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या