मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Jyoti Kalani: माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन

Jyoti Kalani: माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन

Jyoti Kalani passes away: उल्ल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन झाले आहे.

Jyoti Kalani passes away: उल्ल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन झाले आहे.

Jyoti Kalani passes away: उल्ल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन झाले आहे.

उल्ल्हासनगर, 18 एप्रिल: उल्हासनगर (Ulhasnagar) शहरात राजकीय दबदबा असणाऱ्या ज्योती कलानी (Jyoti Kalani) यांचं आज सायंकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन (Jyoti Kalani passes away) झालं. सायंकाळच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 65 वर्षांच्या होत्या. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी तीनवेळा विजय मिळवला होता.

ज्योती कलानी यांनी उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर स्थायी समिती सभापती, महापौर व आमदार अशी पद त्यांनी भूषवली. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

ज्योती कलानी यांनी उल्हासनगरमध्ये आपलं चांगलं राजकीय वर्चस्व निर्माण केलं होतं. नगरसेवकपदापासून, स्थायी समिती पद, महापौर त्यानंतर आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने आज ज्योती कलानी यांचे निधन झाले.

वाचा: फडणवीस-दरेकरांवर कारवाई करा, नाना पटोलेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

राजकारणात त्या "भाभी" या नावाने परिचित होत्या. उल्हासनगरमधील राजकारण त्यांच्या शिवाय पूर्ण होत नव्हते. कुख्यात टाडा फेम माजी आमदार पप्पू कलानी यांच्या त्या पत्नी होत्या. पप्पू कलानी यांच्या राजकीय वलयामुळे त्या या पदापर्यंत पोहचल्या होत्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्या आजमितीला राष्ट्रवादी सोबत होत्या. मध्यंतरी मोदी लाटेत उलथापालथ झाली मात्र ज्योती कलानी या राष्ट्रवादी सोबत राहिल्या. त्यांच्या निधनाने उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीची जी पोकळी निर्माण झालीय ती न भरून निघणारी आहे.

First published:
top videos

    Tags: NCP, Ulhasnagar