मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाची मंत्रिपदासाठी चर्चा; राठोडांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाची मंत्रिपदासाठी चर्चा; राठोडांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

संजय राठोड यांच्यानंतर बंजारा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी या नेत्याची जोरदार चर्चा सुरू आहे

संजय राठोड यांच्यानंतर बंजारा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी या नेत्याची जोरदार चर्चा सुरू आहे

संजय राठोड यांच्यानंतर बंजारा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी या नेत्याची जोरदार चर्चा सुरू आहे

मुंबई, 28 फेब्रुवारी : शिवसेना नेते संजय राठोड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पूजा प्रकरणावरुन संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला जात आहे. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची आणि कारवाई करण्याची मागणी करीत आहे. दरम्यान आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे.

दुसरीकडे त्यांच्या पदावर कोण येणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. संजय राठोड यांच्यानंतर बंजारा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांची चर्चा होत आहे. ते अधिवेशनासाठी सध्या मुंबईत आहे. या प्रकरणावर ते म्हणाले की, मी सध्या अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत आहे. आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की, संजय राठोड या प्रकरणाच्या चौकशीतून सुखरूप बाहेर पडतील. दरम्यान पक्षाने जबाबदारी दिल्यास मी स्वीकारेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आणखी एका हाती आलेल्या बातमीनुसार संजय राठोड यांच्या खात्याचा चार्ज तात्पुरता अन्य कॅबिनेट मंत्र्यांकडे देण्याची शक्यता आहे. आज याबाबत निर्णय होईल. तुर्तास तरी कॅबिनेट मंत्रिपदाची नियुक्त करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा-संजय राठोडांचा राजीनामा मंजूर केल्यामुळे पोहरादेवीचे महंत संतापले, म्हणाले...

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजाचं नेतृत्व कोण सांभाळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजामध्ये निराशा पसरू नये यासाठी ठाकरे सरकारकडून नवं नाव शोधलं जात होतं. दरम्यान माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू इंद्रनील नाईक यांचं नाव चर्चेत आलं आहे. ते राष्ट्रवादी पक्षाचे पुसदमधील आमदार आहेत. त्याशिवाय बंजारा समाजात त्यांची विश्वासू, तरुण, अभ्यासपूर्ण अशी प्रतिमा आहे.

कोण आहे इंद्रनील नाईक?

महाराष्ट्राचे बारा वर्षांपर्यंत कार्यकाळ सांभाळणारे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे नातू आणि महाराष्ट्राचे 1993 मध्ये मुख्यमंत्री झालेले सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आणि महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मनोहरराव नाईक यांचे सुपुत्र पुसद विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुशिक्षित, विनम्रतेने वागणारे आणि गोरगरिबांना सन्मानाची वागणूक देणाऱ्या इंद्रजीत नाईक यांच्याबद्दल बंजारा समाजात विश्वास आहे. सातत्यानं जनतेच्या  कामासाठी झटत राहणे अशी ओळख असलेले राष्ट्रवादीचे पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांनी 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे सदस्य आणि त्यांचे सख्ख्या चुलत भाऊ एडवोकेट निलय नाईक यांचा दहा हजार मतांच्या फरकाने पराभव करत आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली.

नाईक घराण्याला विशेषता नाईक घराण्याच्या रूपाने महाराष्ट्राला बंजारा समाजाचे 14 वर्ष मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील बंजारा समाज हा नाईक घराण्याला मानतो. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये इंद्रनील नाईक यांना जर संधी दिली तर यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्रातील संपूर्ण बंजारा समाजाला चांगला संदेश पोहोचले. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडून इंद्रनील नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची पुसद विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

First published:

Tags: Beed, BJP, Modi government, Narendra modi, Pooja Chavan, Sanjay rathod