दिव्यांच्या त्या 9 मिनिटांसाठी 50 हजार कर्मचारी 24 तास होते सेवेत

दिव्यांच्या त्या 9 मिनिटांसाठी 50 हजार कर्मचारी 24 तास होते सेवेत

तर देशात 9 मिनिटे दिवे बंद झाल्यावर 12000 मेगावॅट वीजेची मागणी कमी झाली. पण वीज पुरवढ्यात कुठेही व्यत्यय आला नाही.

  • Share this:

मुंबई 05 एप्रिल : कोरोनामुळे सर्व देशावर आलेले नकारात्मकतेचं मळभ दूर व्हावं म्हणून पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. गेली काही दिवस सगळ्याच माध्यमातून याची चर्चा होती. आज रात्री 9 वाजता सर्व देशभर लोकांनी आपल्या घराबाहेर दिवे लावले. हे दिवे लावताना घरातले दिवे बंद करण्यात आले होते. सगळ्यांनी एकदाच दिवे बंद केलेत तर अचानक मागणी कमी झाल्याने वीज वितरण यंत्रणा कोलमडून जाईल अशीही शक्यता व्यक्त केली जात होती. त्यावर दावे प्रती दावेही केले जात होते. मात्र सगळचं काही सुरळीत पार पडलं. त्या 9 मिनिटांमध्ये सगळच सुरळीत राहावं यासाठी राज्यात वीज कंपन्यांचे 50 हजार कर्मचारी गेल्या 24 तासांपासून नियोजन करत होते.

राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊथ हे नागपूरमधल्या नियंत्रण कंक्षातून सगळ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. त्या 9 मिनिटांमध्ये विजेची मागणी तीन हजार मेगावॅट ने कमी झाली होती. 9 पुर्वी ही मागणी 13 हजार मेगावट एवढी होती.

9वाजून 5 मिनीट मागणी 10हजार 120 मेगावॅट, पुन्हा 9 वाजून 12 मिनिटांनी 10 हजार 700 मेगावट एवढी झाली.

तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानेही त्याबाबत माहिती दिली आहे. 9 मिनिटे दिवे बंद करताना 12000 मेगावॅट वीज कमी झाली. परंतु यामुळे ग्रिडमध्ये 32,000 मेगावॅटची घसरण झाली. आता ते पुन्हा सामान्य झाले आहे अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के.सिंह यांनी दिली.

शुभं करोती कल्याणम् , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केले PHOTOS

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्य आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी 9 वाजून 9 मिनिटांला दिवा पेटवून देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. दिव्यांच्या प्रकाशात यावेळी संपूर्ण आसमंत उजळून निघाला आहे.

नरेंद्र मोदी यांनी स्वत: घरातील लाईट ऑफ करुन दीपक लावले. एवढेच नाही तर त्यांच्या मातोश्री हीराबेन यांनीही दीपक पेटवून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या देशवासीयांचा आत्मविश्वास वाढवला.

बाधित झालेल्या नर्सने केली कोरोनावर मात, आता पुन्हा त्याच वॉर्डमध्ये जायचं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला नवी मुंबईत देखील चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. नवी मुंबईत सिडको एक्सिबिशन सेंटर मध्ये उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रातील नागरिकांनी देखील मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावून या आवाहनाला प्रतिसाद दिला.

या निवारा केंद्रात 240 नागरिकांना ठेवण्यात आले असून त्यांनी देखील आपण एक असून कोरोनाविरुद्ध सर्व मिळून ताकदीने लढण्याचा संदेश दिला. यावेळी नागरिकांनी टाळ्या देखील वाजवत पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला.

First published: April 5, 2020, 11:09 PM IST

ताज्या बातम्या