लॉकडाऊनची शिस्त पाळली आणि कोरोनाला हरवलं! वरळीकरांनी करुन दाखवलं, मिळाली प्रतिबंधित क्षेत्रातून मुक्ती

लॉकडाऊनची शिस्त पाळली आणि कोरोनाला हरवलं! वरळीकरांनी करुन दाखवलं, मिळाली प्रतिबंधित क्षेत्रातून मुक्ती

लाॅकडाऊन नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात 62 हजार 978 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र लॉकडाऊनचे पालन केल्यास कोरोनावर नियंत्रण शक्य आहे

  • Share this:

 

मुंबई, 22 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबरोबरच लॉकडाऊनच उल्लंघन करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. लाॅकडाऊन नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात 62 हजार 978 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील वरळी या परिसरातील तीन भागांमधील प्रतिबंधित क्षेत्र हटविण्यात आलं आहे.

वरळीतील आदर्श नगर, पोलीस कॅम्प आणि वीरा इमारत या भागात रुग्णसंख्या जास्त येत असल्याने प्रतिबंधित क्षेत्र (Hotspot) म्हणून घोषित करण्यात आले होते. यानंतर येथील नागरिकांनी काटेकोरपणे नियमांचे पालन केले. त्यामुळे गेल्या आठवड्यात या भागातून एकही रुग्ण सापडला नाही. यानंतर येथील प्रतिबंधित क्षेत्र हटविण्यात आले आहे. लोकांनी प्रतिबंधित क्षेत्रांचे नियम पाळल्यामुळे हे घडलं आहे. यामध्ये पालिका अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाबरोबरच नागरिकांचा पाठिंबा असल्याने कोरोनाच्या रुग्णांवर नियंत्रण आणता आलं आहे.

राज्यात क्वारंटाइन केलेले 595 नागरिक घराबाहेर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. क्वारंटाइन करण्याची सूचना असल्यास त्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसते. मात्र अशा परिस्थिती घराबाहेर पडलेल्या 595 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत लाॅकडाऊनच्या काळात 13 हजार 869 जणांना अटक करण्यात आली असून 44 हजार 135 वाहने जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात  2 कोटी 42 लाख 76 हजार 544 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  मुंबई, ठाणे आणि अहमदनगर या भागात सर्वात जास्त लाॅकडाऊन नियंमांचे उल्लंघन केल्याच्या घटना समोर आल्या आहेतय

पोलिसांवरील हल्ले

तब्बल 134 पोलिसांना लाॅकडाऊन दरम्यान मारहाण करण्यात आल्याची धक्क्दायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी मारहाण प्रकरणी 477 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस दिवस-रात्र आपली ड्यूटी करीत असतात. त्यांना कोरोनाचा धोका असतानाही ते नागरिकांसाठी रस्त्यावर असतात. अशातच राज्यातील 12 पोलीस अधिकारी आणि 53 पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

संबंधित - कोरोनाशी लढणाऱ्या आशा वर्कर्संना धक्कादायक वागणूक, वाट्याला आल्या दगडफेक, शिव्या

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: April 22, 2020, 4:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading