मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत 2021 मधील पहिली Murder Case, बॉयफ्रेंडने 19 वर्षीय मुलीला संपवलं

मुंबईत 2021 मधील पहिली Murder Case, बॉयफ्रेंडने 19 वर्षीय मुलीला संपवलं

पार्टीतच दोन मित्रांनी मिळून एका 19 वर्षीय मुलीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

पार्टीतच दोन मित्रांनी मिळून एका 19 वर्षीय मुलीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

पार्टीतच दोन मित्रांनी मिळून एका 19 वर्षीय मुलीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 2 जानेवारी : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत हत्येची घटना घडली आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतच दोन मित्रांनी मिळून एका 19 वर्षीय मुलीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील खार परिसरात असणाऱ्या भगवती या इमारतीत ही हत्या झाली.

पार्टी सुरू असताना झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. जान्हवी कुकरेजा असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव असून हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये मृत तरुणीच्या बॉयफ्रेण्डचाही समावेश असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी श्री जोगधनकर आणि दिया पडनकर यांना ताब्यात घेतलं आहे.

'पार्टी सुरू असल्याने मोठ्या आवाजात गाणी सुरू होती. अशातच जान्हवी कुकरेजा हिला दोन जणांनी मारहाण सुरू केली. केस ओढत तिला खाली पाडण्यात आलं. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. पायऱ्यांवर तिचं रक्तही सांडलं होतं,' अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत 'टाइम्स ऑफ इंडिया'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यू आहे. त्यातही थर्टी फस्टवेळी सर्वच शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. अशा स्थितीतही खार परिसरात ही पार्टी झालीच कशी? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai, Mumbai News, Mumbai police