Home /News /mumbai /

Social Distancing चे नियम तुडवले पायदळी, ठाण्यातील हॉटेल सील

Social Distancing चे नियम तुडवले पायदळी, ठाण्यातील हॉटेल सील

कोरोना वाढत असतानाही अनेक ठिकाणी नियमांचं अजिबातही पालन होत नसल्याचं समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाण्यातील एका हॉटेलवर कारवाई करण्यात आली असून हॉटेल सील (Hotel Seal) करण्यात आलं आहे.

    ठाणे 23 फेब्रुवारी : राज्यातील कोरोनाचा (Corona Virus) प्रसार पुन्हा एकदा झपाट्यानं वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीत नियमांचं पालन करा, मास्कचा वापर करा, गर्दी टाळा (Social Distancing) असं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जात आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी हे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. योग्य ती खबरदारी न घेतल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिला असला तरी अनेक ठिकाणी नियमांचं अजिबातही पालन होत नसल्याचं समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाण्यातील एका हॉटेलवर कारवाई करण्यात आली असून हॉटेल सील (Hotel Seal) करण्यात आलं आहे. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न केल्यानं ठाण्यातील शिल्पा बार आणि रेस्टॉरंटला ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी सील ठोकले. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्व हॉटेल्समध्ये एकूण क्षमतेच्या केवळ 50 टक्के ग्राहकांनाच आत घेण्याची परवानगी दिलेली आहे. अशात सदर बारमध्ये मात्र गिऱ्हाईकांची मोठी गर्दी झाली होती. हा बार ठाण्यातील गजबजलेल्या आराधना सिनेमा समोर स्थित असून हा लेडीज बार आहे. त्यामुळे, अनेकदा इथे नियमांची पायमल्ली करत गर्दी होताना दिसत असते. याठिकाणी मोठी गर्दी झाली असल्याची माहिती मिळताच पालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आणि कर्मचाऱ्यांनी अचानक याठिकाणी येत  भेट दिली. यावेळी दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक ग्राहक याठिकाणी उपस्थित असल्याचं आढळलं. यानंतर पालिका उपायुक्तांनी तात्काळ कारवाई करत सदर हॉटेलला सील ठोकत कारवाई केली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Social distancing

    पुढील बातम्या