जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अग्निकन्येवर 8 जुलैला गंभीर गुन्हा, आता शिंदे गटात प्रवेश, चर्चांना उधाण

अग्निकन्येवर 8 जुलैला गंभीर गुन्हा, आता शिंदे गटात प्रवेश, चर्चांना उधाण

अग्निकन्येवर 8 जुलैला गंभीर गुन्हा, आता शिंदे गटात प्रवेश, चर्चांना उधाण

शीतल म्हात्रे यांनी कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला समर्थन दिलं का?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,14 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये इन्कमिंग सुरूच आहे. मुंबईतील शिवसेनेच्या पहिल्या नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पण, शीतल म्हात्रे यांच्यावर गंभीर गुन्हे असल्याचं समोर आलं आहे. शीतल म्हात्रे यांनी कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला समर्थन दिलं का? असे सवाल आता उपस्थितीत केले जात आहे. कारण, एका 22 वर्षीय मुलाला मारहाण केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर 8 जुलैला रोजी एफआयआर दाखल झाला आहे. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला समर्थन देत प्रवेश केला आहे. याआधी मात्र अत्यंत वाईट शब्दात शीतल म्हात्रे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि इतर फुटीर आमदार यांच्यावर टीका केली होती, असं असतानाही शीतल म्हात्रे यांना शिंदे गटात प्रवेश देण्यात आला. शीतल म्हात्रे या दहीसर पश्चिम येथील वॅार्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका आहेत. शीतल म्हात्रे दोन वेळा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. शिवसेना प्रवक्ते पदी शीतल म्हात्रे यांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, ज्या नगरसेविकेला संजय राऊतांनी अग्निकन्या असं नाव दिलं होतं. त्यादेखील आता बंडखोरांच्या गटात सामील झाल्याची भावाना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. याचा विरोध करीत वॉर्ड क्रमांक 7 च्या शाखेवर लावलेल्या फोटोंवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं आहे. ज्यानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात