Home /News /mumbai /

एसटी महामंडळासमोर मोठे आर्थिक संकट, 2 हजार कोटींचं घेणार कर्ज!

एसटी महामंडळासमोर मोठे आर्थिक संकट, 2 हजार कोटींचं घेणार कर्ज!

राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईसह मोठ्या शहरातील आगार आणि एसटीची मालमत्ता हजारो कोटींच्या घरात आहे.

मुंबई, 30 ऑक्टोबर : आर्थिक तोट्यामुळे नुकसानीचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन एसटी महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation)आपली मालमत्ता तारण ठेऊन बँकेकडून कर्ज  घेण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील सहा महिन्यांचे पगार आणि स्वेच्छा निवृत्तीसाठी लागणारे पैसे देण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या  राज्य परिवहन महामंडळाने आता मोठे कर्ज घेण्याचा निर्णय घेणार आहे.  महामंडळाची मुंबईसह मोठ्या शहरातील आगार आणि एसटीची मालमत्ता हजारो कोटींच्या घरात आहे. ही मालमत्ता तारण ठेवण्यात येणार आहे.  त्या बदल्यात 2 हजार कोटींचं कर्ज घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.  या कर्जासाठी 20 कोटी रुपयांचा मासिक व्याज एसटीला द्यावा लागणार आहे. उर्मिला मातोंडकर यांना मुख्यमंत्र्यांचा फोन, सेनेकडून मोठ्या ऑफरची चर्चा राज्य सरकारने पुढील पगारासाठी पैसे देण्यास असमर्थता दाखवल्याने एसटी महामंडळाला हा पर्याय निवडावा लागणार आहे. यासाठी राज्य शासनाने हमी घ्यावी, हा पर्याय पण निवडला जाणार आहे. राज्य सरकारकडून याआधीही एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला होता. दिवाळी सणातील STची हंगामी तिकीट दरवाढ रद्द दरम्यान, एसटी महामंडळाच्या हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्याच्या निर्णयाला राज्य परिवहन प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरीनुसार, यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून 30 टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी 10 ते 15 टक्केपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये, म्हणून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत, दिवाळी सुट्टीच्या कालावधीतील अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसी चढली 125 फूट उंच पाण्याच्या टाकीवर गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने अशा बिकट परिस्थितीमध्ये अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करून आपल्या 'प्रवासी देवो भवः'या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या