Home /News /mumbai /

धारावीतील 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू, मुंबईत आज 6 जणं दगावले

धारावीतील 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू, मुंबईत आज 6 जणं दगावले

रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजना केल्यामुळेच धारावीत रुग्णांची संख्या घटली आल्याने प्रशासनाची चिंता कमी झाली आहे.

रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजना केल्यामुळेच धारावीत रुग्णांची संख्या घटली आल्याने प्रशासनाची चिंता कमी झाली आहे.

या रुग्णामध्ये 23 मार्च रोजी कोरोनाची लक्षणे दिसली होती, त्यानंतर 9 व्या दिवशी त्याचा मृत्यू झाला

    मुंबई, 1 एप्रिल : मुंबईतील कोरोना रुग्णांची भीती वाढण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच एका धक्कादायक बाब समोर आली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीतील (Dharavi) 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णाला सायन (Sion Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. देशभरात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या 1700 पार गेली आहे. दिल्लीतील (Delhi) मरकज येथे झालेल्या परिषदेनंतर देशभरात कोरोना (Covid - 19) पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात धारावीत कोरोना रुग्ण सापडल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. संबंधित - आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत 'कोरोना' शिरला, धारावीत पहिला पॉझिटिव्ह रुग्ण हा 56 वर्षीय व्यक्ती धारावीतील बलिगा नगर येथे राहत होता. 23 मार्च रोजी त्यांना ताप व इतर लक्षणे दिसत असल्याने ते स्थानिक डॉक्टरांकडे गेले होते. त्यानंतर 26 मार्च रोजी त्यांनी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 1 एप्रिल रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. म्हणजेच लक्षणे दिसल्यानंतर तब्बल 9 दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या व्यक्तीची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. त्यांचे एकेजी नगर येथे गार्मेंटचे दुकान आहे. धारावी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर बालिगा नगर येथील 300 फ्लॅट्स आणि 90 दुकानं सील करण्यात आली आहे. याशिवाय हाय रिस्कमधील नागरिकांना क्वारंटाइनचा शिक्का लावण्यात आला आहे. या भागातील आजारी नागरिकांची तपासणी केली जात आहे. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानी नाही. तर खाण्याचे पदार्थ आणि रेशन बीएमसीकडून पुरवले जात आहे. जोपर्यंत हाय रिस्क असणाऱ्यांच्या चाचणीचा निकाल येत नाही तोपर्यंत कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले आहे. आज दुपारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत तब्बल 5000 जण क्वारंटाइनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. त्यातच आता सर्वाधिक कोरोना पसरले अशी भीती असलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Dharavi

    पुढील बातम्या