Home /News /mumbai /

Father's day 2020 : 'प्रिय बोस्की...' गुलजार यांनी लेकीला लिहिलेलं पण वाचून डोळ्यात येईल पाणी

Father's day 2020 : 'प्रिय बोस्की...' गुलजार यांनी लेकीला लिहिलेलं पण वाचून डोळ्यात येईल पाणी

'या पत्राच्या अखेरीस मी सही करताना कशी करावी, डॅड, पापा की गुलजार...'

    मुंबई, 20 जून : मुलगी हवी हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तिला सांभाळण्यापासून ते अगदी तिच्या करियरच्या सुरुवातीपर्यंतचा प्रवास डोळ्यात साठवणाऱ्या शब्दात साकारणारे सुप्रसिद्ध गीतकार आणि शायर गुलजार यांनी आपल्या मुलीसाठी खास पत्र लिहिलं होतं. गुलजार यांना मुलगी हवी होती आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मुलगी झाल्यानं ते लाडानं तिला बोस्की म्हणातात. त्यांनी आपल्या मुलीवर बंधनं घातली नाहीत. तिला मुक्त जगायला शिकवलं. जेव्हा गुलजार यांची कन्या मेघनानं सेंट झेवियर्स महाविद्यालयातून आपलं शिक्षण घेतलं. 1994 साली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मेघना सुट्ट्यांमध्ये न्यूय़ॉर्कला गेल्या. त्यामुळे निकाल घेण्यासाठी वडिलांना जावं लागलं. यावेळी गुलजार यांनी मार्कशीटसोबत एक पत्रही मेघना यांना पाठवलं होतं. ते तिला लाडानं बोस्की म्हणायचे. गुलजार यांनी मेघनाला लिहिलेलं पत्र... माझ्या प्रिय पदवीधर झालेल्या मुलीस... 'सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे याआधीच तू आपल्या वडिलांच्या योग्यतेचा रेकॉर्ड मोडला आहेस. तुझं खूप अभिनंदन! तू आता एका अशा पठारावर उभी आहेस जिथून तुला क्षितीज आणि त्या पलिकडचंही पाहू शकतेस. आपल्या व्यक्तीमत्त्वासाठी आणखी एक झेप आवश्यक आहे. आपल्याला दिशा निवडावी लागेल. दोन-तीन वर्षांच्या शिक्षणापेक्षा शैक्षणिक भाग संपला आहे. आता तू जे काही करशील ते तुझ्या स्वत:च्या आवडीचं आणि तू निवडलेलं असेल. स्वत:ला शोधायचं असेल तर प्रयत्न महत्त्वाचे आहेत. प्रयत्नांशिवाय आपण आपल्याला शोधू शकत नाही. स्वत: ला शोधण्यासाठी आणखी एक प्रयत्न कर. तू आता मोठी कामगिरी कऱण्यासाठी सक्षम आहेस हे मला माहीत आहे. तुला फक्त ठरवायचं आणि ते पूर्ण करायचं आहे. तू करशील याची मला खात्री आहे. तुझी आई 29 तारखेला निघून येत आहे. ती तुला खूप मिस करते. तुझंही तिच्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे. पण त्या प्रेमाखातर तिच्याशी भांडू नकोस. तुझी आई खूप शिस्तबद्ध आहे आणि तितकीच खूप उदार हृदय असलेली प्रेमळ आहे. या पत्राच्या अखेरीस मी सही करताना कशी करावी, डॅड, पापा की गुलजार...' वडिलांनी माझ्या ग्रॅज्युएशनच्या वेळी लिहिलेलं हे पत्र माझ्या मनात कायम आत्मविश्वास निर्माण करणार आहे असं मुलगी मेघना गुलजार यांनी म्हटलं आहे. माझ्या पालकांनी त्यांची मतं, महत्त्वाकांशा लादल्या नाहीत. याउलट त्यांनी मला दृष्टी देण्याचा आणि एक्स्प्लोर करण्याचा प्रयत्न केला असंही मेघना गुलजार यांनी या पत्राविषयी बोलताना सांगितलं आहे. हे वाचा-बाप तो बाप होता है! बॉलिवूडचे सुपर कूल डॅडी ज्यांनी मुलांना दिलं सर्वोत्तम गिफ्ट हे वाचा-Fathers Day: पंडित नेहरुंनी लाडकी लेक ‘इंदू’ला 30 पत्रांमधून सांगितला होता जगाचा संकलन - क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Fathers day, Fathers day 2020

    पुढील बातम्या