मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईतील स्फोटकांसह कार प्रकरणाचा तपास NIA कडे द्यावा, फडणवीसांची मागणी

मुंबईतील स्फोटकांसह कार प्रकरणाचा तपास NIA कडे द्यावा, फडणवीसांची मागणी

 राज्यातील गुन्हेगारीच्या मुद्यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यातील गुन्हेगारीच्या मुद्यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यातील गुन्हेगारीच्या मुद्यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

 

मुंबई, 05 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील गुन्हेगारीच्या मुद्यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईत जिलेटीनच्या कांड्यास सापडलेल्या गाडी प्रकरणाची एनआयएच्या मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी फडणवीस यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारीच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

'मुंबई देशातील उद्योगपतींचं घर आहे. देशात संपत्ती निर्माण करतात. 26 तारखेला जिलेटीनने भरणारी कार सापडली. ही कार आली कुठून? याचा शोध घेतला पाहिजे. मनसुख मिश्रीलाल हिरेन, ठाणे यांनी कार चोरी झाल्याची तक्रार दिली होती. हीच गाडी स्कॉर्पिओ कार पेडर रोडला सापडली. नंतर एक पत्र जैश उल हिंदच्या नावाने आलं. जैश उल हिंदने या घटनेशी आपला काही संबंध नाही, असं स्पष्ट केलं. या संघटनेने भारतीय गुप्तचर यंत्रणांनी खोटे पत्र आणि खोटे टेलिग्राम अकाऊंट असल्याचं सांगितले', अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

तसंच, 'घटनास्थळावर तिथे दोन्ही गाड्या ठाण्याहून आल्या होत्या. तिथे मुंबई पोलीस दलाचे सचिन वझे पोहोचले. सचिन वझेंना का काढलं हे मला माहिती नाही. माझ्याकडे सीडीआर आहे हिरेन आणि सचिन वझे यांचे फोन संभाषण आहे. हे दोघेही ठाण्याला राहतात. ते ओलाला बसून क्रॉफर्ड मार्केटला गेला, तिथे त्याला तो भेटला. त्या ओलाच्या ड्रायव्हरला हा माणूस कोण भेटला हे माहिती आहे. गाडी सापडल्यावर तिथे वझे पोहोचले. ते धमकीचं पत्रही वझेंना मिळालं. मग एक टेलिग्राम संदेश येतो आणि ती संघटना या प्रकरणाशी काही संबंध नाही, असं सांगतात. या प्रकरणात बराच संशय आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी एनआयएला द्यावी', अशी मागणी फडणवीस यांनी केली.

'सुनील प्रभू कंगना रनौतबद्दल बोलले. कंगनाने पोलिसांबद्दल जे काही वक्तव्य केले त्याचे कधीच समर्थन होऊ शकणार नाही. आम्हाला मुंबई पोलिसांचा अभिमान आहे. पण अनिल गोटे काय बोलले पोलिसांबद्दल आक्षेपार्ह बोलले होते. याबद्दलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे पण

साधी FIR दाखल केली नाही. कंगना बोलली ते चूक पण हा किती मोठा अपमान ते सत्तारूढ बरोबर आहेत म्हणून गुन्हा दाखल केला नाही', असा आरोपही फडणवीस यांनी केला.

'कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार आकड्यात करणं योग्य नाही. मुळात लोकांना सुरक्षित वाटतंय का हे महत्त्वाचे मागे safety perception index तयार करुन माहिती घेतली होती. २००० च्या सुरुवातीला तेलगीची केस सुरू झाला होता त्याच नाशिकमध्ये स्टॅंप पेपर घोटाळा आलाय. गोटु वाघ नावाचा व्यक्ती यामुळे कोट्यावधींचा मालक झालंय. 50 हजार खरेदी खात्यांचे व्यवहार असे झालेत अशी माहिती आहे. हे नवे तेलगी प्रकरणी सुरू झाले आहे', अशी टीका फडणवीस यांनी केली.

'वाळू माफियांची नवी पद्धत आहे की ऑफसेट किंमत जास्त ठेवायची म्हणजे कोणी यात येऊ शकत नाहीतात्काळ ऑफसेट किंमत कमी करुन रेतीघाट खुले केले पाहिजेत. राज्याचा महसुलही बुडतोय. भंडारात पोलीस चौकी जाळण्यात आली पोलीस-जिल्हा प्रशासन-रेती माफिया यांचे संगनमत आहे', अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

First published:
top videos