मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, माजी आयुक्तांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, माजी आयुक्तांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

Parambir Singh Extortion Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Parambir Singh Extortion Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Parambir Singh Extortion Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

मुंबई, 22 जुलै: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा (Case Of extortion Registered) दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत सचिन वाझे (Sachi Waze)याच्यामार्फत पैसे वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या लेटरबॉम्बनंतर राज्याचं पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. तसंच अनिल देशमुख यांनाही गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये  परमबीर सिंह  यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांच्या 8 जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 6 पोलीस आणि दोन इतरांचा समावेश आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय.

राज्य सरकारनं ACB ला दिले आदेश

गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारनं परमबीर सिंह प्रकरणी आता मोठा निर्णय घेतला. राज्य सरकारकडून भ्रष्टाचारविरोधी ब्यूरोला (Anti Corruption Bureau) परमबीर सिंह यांच्याविरोधातील तक्रारींचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. महाराष्ट्र पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांच्यावर पैसे घेणे आणि पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा- Kolhapur Rain: कोल्हापूर जिल्ह्याल पुन्हा पुराचा धोका, NDRF ची टीम रवाना

ईडीच्या रडारवरही परमबीरसिंह

परबीर सिंह सुद्धा ईडीच्या (ed) रडारवर आले असून लवकरच त्यांची चौकशी होणार, असल्याची माहिती समोर आली आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी लवकर परमबीर सिंग यांना चौकशीला बोलावून त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यांना त्याबद्दल समन्स सुद्धा बजावला आहे.

 24 लाखांचे भाडे थकवले

परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त (Thane Police Commissioner) असताना मलबार हिल (Malabar Hill, Mumbai) परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होते. या अपार्टमेंटमध्ये राहत असताना त्यांनी त्याचं भाडे दिले नसल्याचा (not paid rent) त्यांच्यावर आरोप आहे.

First published:

Tags: Mumbai police, Paramvir sing