मुंबई, 19 मे: महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागात असलेल्या जिल्ह्यांत तौत्के चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) चांगलेच थैमान घातले. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता शासकीय यंत्रणेणे खबरदारी म्हणून सुरक्षेच्या संदर्भात पूर्वतयारी केली होती. मात्र, या चक्रीवादळात खवळलेल्या समुद्रात चार बार्ज मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर भरकटले. या बार्जवर 700 हून अधिक कर्मचारी उपस्थित होते. यापैकी 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. याच प्रश्नावरुन नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ओएनजीसी **(ONGC)**वर गंभीर आरोप करत सवाल उपस्थित केले आहेत. नवाब मलिक यांनी ट्विट्स करत म्हटलं, तौत्के चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर जोरदार प्रहार करणार हे संबंधित यंत्रणेने सांगितलेले असतानाही ONGC ने सर्व सूचनांकडे दुर्लक्ष का केले? सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का नाही केले? असा सवाल करतानाच कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Then why did the #ONGC not pay heed to all the warnings and follow safety protocols ?
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 19, 2021
They should have evacuated all their workers from the barges and brought them to shore before the onset of the Cyclone. (2/4)
VIDEO: खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या 611 कर्मचाऱ्यांना केलं रेस्क्यू; 26 मृत्यू, अद्यापही काही बेपत्ता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं, तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला अवगत करण्यात आले होते आणि सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला होता. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहनही करण्यात आले होते. मग ओएनजीसीने या सर्व सूचनांकडे दुर्लक्ष का केले आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का केले नाही? चक्रीवादळ सुरू होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना बार्जमधून बाहेर का काढले नाही आणि किनाऱ्यावर आणले नाही? यामुळेच 60 निरपराध कामगारांचे जीव धोक्यात आले. अद्यापही 60 हून अधिक बेपत्ता आहेत आणि बऱ्याच जणांनी आपले जीव गमावले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने याचे उत्तर द्यायला हवे. जे या बार्जवर प्रभारी होते त्यांनी योग्यवेळी स्थानांतर करण्याचा निर्णय घेतला नाही अशा लोकांवर कारवाई करुन शिक्षा कऱण्यात यावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. या बचाव कार्यात भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने रेस्क्यू ऑपरेशन करून कामगारांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे असंही नवाब मलिक म्हणाले.