मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO: खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या 611 कर्मचाऱ्यांना केलं रेस्क्यू; 26 मृत्यू, अद्यापही काही बेपत्ता

VIDEO: खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या 611 कर्मचाऱ्यांना केलं रेस्क्यू; 26 मृत्यू, अद्यापही काही बेपत्ता

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 175 किलोमीटर दूरवर भरकटलेल्या बार्जवरुन कर्मचाऱ्यांचे रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे.

मुंबई, 19 मे: तौत्के चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात चार बार्ज भरकटले. या चारही बार्जवर एकूण 707 खलाशी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बार्जचे नांगर तुटल्याने खवळलेल्या समुद्रात ते भरकटले. बार्ज भरकटल्याची माहिती मिळताच नौदलाने (Indian Navy) युद्धपातळीवर आपलं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. आतापर्यंत 611 जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आणि 61 कर्मचारी हे बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे.

" isDesktop="true" id="553055" >

भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून या सर्व कर्मचारी, खलाशांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन तात्काळ सुरू करण्यात आले. भारतीय नौदलाकडून INS कोच्ची, INS कोलकाता, INS तलवार, INS बेतवा आणि INS बीयास या युद्धनौकांच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. यासोबतच नौदलाचे तीन हेलिकॉप्टरही बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले होते.

P-305 या बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते त्यापैकी 184 कर्मचाऱ्यांना नौदलाने रेस्क्यू केलं आहे. आयएनएस कोच्ची या युद्दनौकेच्या सहाय्याने या कर्मचाऱ्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. ताशी 100 किमी वाऱ्याचा वेग असतानाही नौदलाने युद्धपातळीवर कार्य करुन कर्मचाऱ्यांना वाचवलं आहे. अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

चारही बार्जवरुन नौदलाच्या टीमने आतापर्यंत 611 जणांना रेस्क्यू केलं आहे. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अद्यापही 61 कर्मचारी हे बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. खवळलेल्या समुद्रात बार्ज भरकटल्यानंतर घाबरलेल्या काही कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या घेतल्या आणि त्यानंतर खवळलेल्या समुद्रात त्यापैकी काहींनी आपले प्राण गमावले.

First published:

Tags: Cyclone, Indian navy, Mumbai