जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईची बत्ती गूल होण्यामागे घातपाताची शक्यता? ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले...

मुंबईची बत्ती गूल होण्यामागे घातपाताची शक्यता? ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले...

मुंबईची बत्ती गूल होण्यामागे घातपाताची शक्यता? ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले...

सोमवारी मुंबई-ठाणे-नवी मुंबईसह उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्याच आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 ऑक्टोबर : राज्याची राजधानी मुंबईसह उपनगरात वीज पुरवठा खंडित झाला होता. याबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आता मोठा विधान केलं आहे. मुंबई, नवी मुंबईचा वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येणार नाही असं ट्वीट ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. मुंबईत काही ठिकाणी अडीच तर उपनगरांमधील काही भागांमध्ये सहा ते आठ तास वीजपुरवठा खंडित झाला होता या प्रकरणी कसून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मुंबईतील वीजपुरवठा खंडित करण्यात घातपाताचा मोठा कट असू शकतो अशी शक्यता स्वत: ऊर्जा मंत्र्यांनी व्यक्त केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. तांत्रिक बिघाडाला कोण जबाबदार आणि या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई-ठाणे-नवी मुंबईतील वीज पुरवठा सोमवारी खंडित झाल्यामुळे काही तास अनेक काम रखडली होती.

जाहिरात

हे वाचा- वाह प्रशासन! अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोमणा मुंबईसह उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे बराच काळ लोकल ठप्प होत्या. तर मंत्रालयापासून ते झेरॉक्सच्या दुकानापर्यंत अनेक कामं काही तास रखडली होती. वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर झाला आहे. मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या गाड्या स्थानकांमध्येच काही तास ताटकळत उभ्या राहिल्या होत्या. महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. त्यावेळी सर्व भार हा सर्किट दोनवर टाकण्यात आला होता. मात्र, सर्किट दोनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता’ अशी माहिती सोमवारी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली होती. मात्र आता त्यांनी ट्वीट करून मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं ट्वीट केलं आहे. त्यामुळे आता तपास यंत्राणेची सूत्र त्या दिशेनं वळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात