जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / वीज बिल सवलत की पुन्हा लॉकडाउन? मुख्यमंत्री आज करणार मोठी घोषणा

वीज बिल सवलत की पुन्हा लॉकडाउन? मुख्यमंत्री आज करणार मोठी घोषणा

वीज बिल सवलत की पुन्हा लॉकडाउन? मुख्यमंत्री आज करणार मोठी घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता जनतेशी फेसबुक, युट्यूबवर लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 नोव्हेंबर : दिवाळीनंतर देशासह राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आज रात्री 8 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav thackery) हे जनतेशी संवाद साधणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यावेळी लॉकडाउन (Lockdown) किंवा वीज बिल (Electricity bill) सवलतीबद्दल काय घोषणा करता हे पाहण्याचे ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता जनतेशी फेसबुक, युट्यूबवर लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ते काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. ‘हेच राज्यातील भाजप नेत्यांनाही सांगा’, रोहित पवारांनी केलं मोदींचं कौतुक गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेनंही राज्यभरात सोमवारपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिलाच्या दरात सवलत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्यभरात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी नितीन राऊत यांच्याशी वीज बिल सवलत देण्याबाबत चर्चा केली होती. याबद्दल एक आढावा बैठकही नुकतीच पार पडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वीज बिल सवलतीबद्दल काही घोषणा करता का हे पाहण्याचे ठरणार आहे. दुसरीकडे 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहे. पण, स्थानिक पातळीवर महापालिकांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. नागपूर, पुण्यात कोरोनाची परिस्थिती वाढत असल्यामुळे शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय  मागे घेता का, हेही पाहण्याचे ठरणार आहे. एसटी महामंडळाचं खासगीकरण करण्याचा ठाकरे सरकारचा डाव, दरेकरांचा सणसणीत आरोप कोरोनाच्या परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे,  पुणे आणि मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता, ज्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या जास्त आहे, अशा  जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कंटेन्मेंट झोनची संख्या वाढवणार किंवा जिल्हा बंदी पुन्हा एकदा लागू केली जाणार, हे ही महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात