Home /News /mumbai /

ईडीच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड; अनिल देशमुखांसह मुलगा ऋषिकेश अडचणीत?

ईडीच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड; अनिल देशमुखांसह मुलगा ऋषिकेश अडचणीत?

Anil Deshmukh: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत असताना आता त्यांचा मुलगा ऋषिकेश याच्या अडचणीत येणार असल्याचं दिसत आहे.

मुंबई, 26 जून: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी पत्र लिहून केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांनंतर आता अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि पीए कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांनाही ईडीने (ED) अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझे याने दिलेल्या जबाबात खळबळजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जी माहिती दिली त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) हा सुद्धा अडचणीत येणार असल्याचं बोललं जात आहे. (ED investigation reveals shocking information) ऋषिकेश देशमुख अडचणीत? ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जे मुद्दे मांडले त्याची एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहे. अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले आणि त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला, जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनींच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यांत परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारतां येत नाही.
हवाला मार्फत पैशांचा व्यवहार? एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा. ''कुंदन शिंदेनं 4 कोटी अनिल देशमुखांना दिले'', सचिन वाझेनं जबाबात केला मोठा खुलासा ईडीने न्यायालयात म्हटले, अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटूंबियांच्या थेट मालकीच्या ११ कंपनी आहेत. या कंपन्यांची आपआपसात पैशांची देवाणघेवाण होत होती. पैशांच्या व्यवहाराला काहीही ठोस कारण असल्याचे आढळून आले नाही. याचाच अर्थ हा पैसा हेरफार केला जात होता. यातील चार कंपन्यांचे संचालक असलेल्या विक्रम शर्मा यांनी अशी माहिती दिली की त्यांची कंपनी बनवण्यासाठी ऋषिकेश देशमुख यांनी पैसे दिले होते. या कंपन्यांत मी संचालक होतो याची मला माहिती ही नव्हती. सचिन वाझेचा जबाब अनिल देशमुख यांच्याकडून थेट आदेश मिळत होते. अनेक पोलीस चौकशीत देखील थेट आदेश मिळत होते. अनिल देशमुखांनी बार आणि रेस्टॉरंट मालकांची लिस्ट दिली होती. 4 कोटी 70 लाख रुपये डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या काळात कुंदन शिंदे यांना दिले. नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत. कुंदन शिंदे या संस्थेचा सदस्य आहे. या संस्थेच्या बॅंक स्टेटमेंटचा अभ्यास केला असता गेल्या काही काळात 4 कोटी 18 लाख रुपये या संस्थेला दिल्लीच्या विविध कंपन्यांकडून मिळाले आहेत. चौकशीत समोर आलं की या कंपन्या फक्त पेपरवर आहेत आणि ट्रान्सफर एन्ट्री करण्याचे काम करतात.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Anil deshmukh, ED

पुढील बातम्या