Home /News /maharashtra /

''कुछ तो होनेवाला है''; असा मॅसेज फिरतोय, एकनाथ खडसेंनी ईडी कार्यालयात जाताना केला मोठा खुलासा

''कुछ तो होनेवाला है''; असा मॅसेज फिरतोय, एकनाथ खडसेंनी ईडी कार्यालयात जाताना केला मोठा खुलासा

Eknath Khadse ED: एकनाथ खडसे ईडीच्या (ED office) कार्यालयात गेलेत. कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

    मुंबई, 08 जुलै: भाजपातून (BJP) राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांना बुधवारी ईडीनं समन्स बजावला. खडसे यांना आज पुण्यातील भोसरी जमीन खरेदी गैरव्यवहार केल्याप्रकरणी चौकशीसाठी बोलवलं आहे. त्यानुसार एकनाथ खडसे ईडीच्या (ED office) कार्यालयात गेलेत. कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य करणार अस म्हणत ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. पाच वर्षापासून ज्यांची चौकशी सुरू आहे त्यावर आता कारवाई करत आहे. माझी पत्नी आणि जावई यांनी खरेदी केलेल्या खासगी जमिनीच्या व्यवहाराबाबत ही चौकशी होत असल्याचं खडसेंनी सांगितलं. भाजप सोडल्यापासून माझ्यामागे चौकशी लावली जात आहे. या चौकशीवर मला संशय येत आहे. संशय येण्यामागे पण एक कारण आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावमधील काही Whatsapp ग्रुपवर कुछ तो होनेवाला है, असा मॅसेज फिरत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा हा प्रयत्न असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहे. हेही वाचा- नारायण राणेंचं मंत्रीपदी प्रमोशन झाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया याच दरम्यान एकनाथ खडसे हे 8 जुलै रोजी एक पत्रकार परिषद घेणार असल्याचं एनसीपीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जाहीर केलं होतं. पण रात्री उशिरा संबंधित पत्रकार परिषद रद्द होत असल्याचा निरोप आला. ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांना 12 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी देखील ईडीनं एकनाथ खडसेंना समन्स बजावला होता. मात्र कोरोनाची लागण झाल्याने उपस्थित राहण्यास अडचण असल्याचं सांगितलं होतं. पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Eknath khadse, Maharashtra, Mumbai, NCP

    पुढील बातम्या